माणुसकीचा घास’ उपक्रमाने 1001 दिवस पूर्ण केले त्या प्रित्यर्थ आधारविश्व फाऊंडेशन गडचिरोली तर्फे आयोजकांचा सत्कार
जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांच्या नातलगांना टिफिनचा आधार
गडचिरोली,
मनुष्यत्वाचा खरा अर्थ ज्या उपक्रमाने जगाला दाखवला, त्या ‘माणुसकीचा घास’ या सामाजिक सेवाप्रकल्पाला 1001 दिवस पूर्ण झाली आहेत. हा उपक्रम १ जानेवारी २०२३ पासून सुरू असून, आजपर्यंत एकही दिवस खंड न घेता निरंतर सुरु आहे. संजय मेश्राम व प्रसाद पवार ह्यांच्या विचारामधून उदात्त हेतू ने हा उपक्रम दोन वर्षा आधी सुरु करण्यात आला.
जिल्हा महिला रुग्णालयात दाखल रुग्णांना शासकीय अन्न मिळते, परंतु त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना जेवणाची सोय नसते. या अडचणीवर ‘माणुसकीचा घास’ हा उपक्रम जणू जीवनदायी ठरला आहे.
रोज ₹२००० च्या अनुदानातून ३० टिफिन तयार होतात. प्रत्येक टिफिनमध्ये भात, भाजी, वरण आणि पोळी असा पौष्टिक आहार दिला जातो. एका व्यक्तीच्या एका वेळच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था, यातून होत आहे.
या सेवेत स्थानिक अन्नदाते हे वर्षभर सातत्याने अन्नदान करत असतात. तसेच काही अन्नदाते महिन्यातून एकदा किंवा गरज पडल्यास तात्काळ संपर्क साधून अन्नदान करतात.
रुग्णालयात येणारा प्रत्येकजण सामान्य कुटुंबातील असतो. ह्या सातत्यपूर्ण समाज उपक्रमाचा विचार करून 1001 दिवस झाल्या निमित्य आधारविश्व फाउंडेशन तर्फे ह्या कर्तृत्वाचा आणि निष्काम सेवेचा सत्कार करण्यात आला, आपल्या छोटेखानी भाषणात हा उपक्रम केवळ अन्नदान नव्हे, तर माणुसकीचा धर्म असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या आधारविश्व फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ गीता हिंगे यांनी दिली.यावेळी आधारविश्व च्या सचिव सुनीता साळवे, सिमा कन्नमवार, अंजली देशमुख,भूमिका बरडे, जोस्त्ना मुळे, व इतर सदस्या बहुसंख्येने उपस्थित होते

0 Comments