माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ. राजे. धर्मरावबाबा आत्राम यांची कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट
      
 कंत्राटी आरोग्य कर्मचारी यांच्या मागण्या विषयी चर्चा करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचे दिले आश्वासन.

आरमोरी:-
       राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दि. 19 ऑगस्ट पासून आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर  कामबंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलन स्थळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मरावबाबा आत्राम भेट देऊन कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या विषयी चर्चा केली. व या विषयावर शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.    
           यावेळी माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष रविंद्र वासेकर, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, प्रदेश सरचिटणीस मोहम्मद युनूस शेख, विधानसभा सहअध्यक्ष सुनील नंदनवार, शहर अध्यक्ष प्रदिप हजारे, युवा नेते आकाश मडावी, मोहित राऊत, उल्हास बनपूरकर उपस्थित होते.
       दि. 14/03/2024 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी यांना नियमित सेवेत समायोजन करणेसाठी शासननिर्णय निर्गमित झाला आहे. सव्वा वर्षे कालावधी होवूनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच मानधनवाढ, बोनस, विमा व बदली धोरण मान्य होत नसल्याने तसेच मा. आरोग्य मंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांनी दि. 08 व 10 जुलै 2025 रोजी संघटना शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता न झाल्याने मंगळवार दि. 19/08/2025 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेले आहे. सदर कर्मचारी हे भर पावसात आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालय समोर आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. अशातच आरमोरी तालुक्याच्या दौऱ्यावर असलेले माजी मंत्री डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन मागण्याविषयी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले..
        आंदोलन करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन दिले. निवेदन देताना अनिता थुल, पूजा व्यास, गौरी निनावे, श्वेता डांगे, प्रियंका कोठारे, सुनीता बागडे, रीता गणवीर, मनीषा राजूरकर, पुण्यशीला ढोरे, एम. एन. रंधये, करुणा गेडाम, व्ही. टी. चिलबुले, एस. एन. हत्तीमारे,  ए. एन. लुटे, एस. एच. डोंगरे, माया खराबे, सुवर्णा बर्डे, निर्मला बावणे, रजनी वाघमारे, प्रतीक्षा वाकडे, सृष्टी मेश्राम, वाहिदा शेख, पौर्णिमा जुमनाके, राजेंद्र चौधरी इत्यादी कंत्राटी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.