हालूर गावातील महिलांचा ठाम निर्णय – गावात दारूबंदीचा ठराव
गडचिरोली : हालूर गावातील ग्रामस्थांनी एकमुखाने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला असून यामध्ये विशेषतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील सामाजिक, आर्थिक,आरोग्यविषयक, कौटुंबिकवाद, तसेच वाहन दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या दारूच्या व्यसनाविरोधात महिलांनी ठाम भूमिका घेतली आहे.
गावकऱ्यांच्या या निर्णयाला सर्वांनी संपूर्ण पाठिंबा दिला असून या उपक्रमातून गावातील विकास, आरोग्य व सामाजिक सौहार्द वृद्धिंगत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दारूमुक्त गावाच्या दिशेने झालेला हा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे,याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यासाठी गावातील सरपंच श्रीमती अरुणाताई मधुकर सडमेक, गावातील पाटील श्री.लच्चू हेडाऊ, भूमिया श्री.धनसू होडे, महिला मंडळाचे अध्यक्षा कलावती तिरकी, उपाध्यक्षा फुलसिना एक्का , सचिव बाली हेडो, नवरी हेडो, बाली हेडो, शांती कुड्येती, तानी हेडो, जमाता हेडो, गीता हेडो, चमेली मिंज, विमला किंडो, कलावती तिरकी, फुलवती टोप्पो, तेरेसा टोप्पो, सविता टोप्पो, सविता बडा, किलसीता रिका, सावित्री आत्राम, बाली आत्राम, अनिता मिंज, इर्पे आत्राम, प्रतिमा तिग्गा, संजना हेडो, रजनी हेडो, कुम्में हेडो, शिवानी गेडाम,
ग्रामसंपर्क केंद्राचे कर्मचारी श्री. किशोर गावडे यांनी पुढाकार घेतला आहे.
0 Comments