बदलीनंतरही कर्मचारी ठाण मांडून; सा. बां. विभागातील चित्र
बदलीचे नियम धाब्यावर; शिस्तभंगाची कारवाई केव्हा? संतोष ताटीकोंडावार यांचा आरोप
अहेरी :
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात शासनाने नियम केले आहेत परंतु लाडक्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून या बदल्यांच्या नियमानांच तिलाजंली देण्यात येत आहे सदर प्रकार सार्वजनीक बांधकाम विभागात सुरु आहे.
सा. बां. विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील गट क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, प्रतिनियुत्क्त्या होऊनही काहीजण अनेक वर्षापासून ठाण मांडून आहेत अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भष्टाचार निर्मुलन समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी केली आहे
तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली पाच, सहा वर्षात करणे क्रमप्राप्त आहे. बांधकाम विभागात मात्र या नियमाला तिलांजली देण्यात आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सार्वजनीक
बांधकाम विभागात अनेक कर्मचारी वर्षानूवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत, या पार्श्वभूमीवर सार्वजनीक बांधकाम विभागाने क्षेत्रीय कार्यालयात बदल्या होऊनही ठाण मांडणा-यांवर शिस्तभंगाच्या कारवाईबाबतचे आदेश २८ जुन २०२४ ला दिले आहेत मात्र यानंतरही काही कर्मचारी गेल्या आठ ते दहा वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत दुर्गम, अतिदुर्गम भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यवधी रुपयांची कामे होतात यामधील गैरव्यवहार नेहमीच चर्चेचा विषय असतो. या कर्मचा-यांचे कंत्राटदारांशी हितसंबंध असतात. यातून त्यांना बदली होऊनही खुर्ची सोडवत नसल्याचा आरोप संतोष ताटीकोंडावार यांनी केला आहे त्यामुळे अशा कर्मचा-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
0 Comments