गडचिरोली जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत क्षेत्रातील आतिक्रमणधारक झोपडपट्टीतील नागरीकांना स्थाई पट्टे द्या - माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी व भाजपा शहरअध्यक्ष, माजी नगरसेवक श्री. अनीलजी कूनघाडकर,
गडचिरोली:
सन 1982 रोजी गडचिरोली जिल्हा निर्माण झाल्याने गडचिरोली शहर व ईतर तालूकास्थानी शहराच्या आजूबाजूला उपलब्ध असलेल्या महसूल, झुडपीजंगल व सींचाई विभागाच्या जागेवर अतीक्रमण करून नागरीक अस्थाई वास्तव्य करीत आहेत. सध्या केन्द्र व राज्य सरकारने अशा लोकांना घरकुल मंजुर केलेले आहे परंतू मागील 40 ते 45 वर्षापासून वास्तव्य करीत असलेल्या झोपडपट्टी धारकांना स्थाई पट्टा देण्यात आलेला नाही. त्यामूळे गोरगरीबांना नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात घरकूल बांधकाम करता येत नाही. हा विषय घेउन डॉ. नामदेवराव उसेंडी माजी आमदार यांनी मान. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणविस व मा. महसुलमंत्री चन्द्रषेखरजी बावनकुळे यांच्याषी या विषयावर चर्चा केली त्यानुसार मा. ना. मुख्यमंत्री तथा महसुलमंत्री यांनी तात्काळ बैठक बोलविण्याचे निर्देष मा. जिल्हाधीकारी गडचिरोली यांना पत्राद्वारे सुचित केले. या पत्राची प्रत मा. जिल्हाधीकारी गडचिरोली यांना देण्यात आली.
त्यावेळेस भाजपा शहरअध्यक्ष, माजी नगरसेवक श्री. अनीलजी कूनघाडकर, किसान सेल चे प्रदेष सचीव श्री. रमेषजी भूरसे, सामाजीक कार्यकर्ते तथा माजी आरोग्य सभापती श्री. चंद्रशेखर भडांगे भाजपा कार्यकर्ता श्री. अविनाष विश्रोजवार, निवृत्त तहसील दार पुश्पाताई कुमरे, भाजप शहर महामंत्री श्री. हर्शल गेडाम व ईतर मान्यवर उपस्थीत होते.
0 Comments