सुरजागड–गट्टा रस्ता दुरुस्तीचा प्रश्न; आंदोलन तात्पुरते स्थगित – मुख्यमंत्री १२ सप्टेंबरला निर्णय घेणार

सुरजागड–गट्टा रस्ता दुरुस्तीचा प्रश्न; आंदोलन तात्पुरते स्थगित – मुख्यमंत्री १२ सप्टेंबरला निर्णय घेणार
गडचिरोली :
सुरजागड–गट्टा रस्त्याच्या दुरुस्ती व डांबरीकरणाच्या मागणीसाठी दीर्घकाळापासून सुरू असलेल्या चळवळीला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निजी सचिव यांनी आंदोलकांचा शिष्टमंडळ ला बैठक करीता बोलावले निजी सचिव श्री. सुनील मित्रा यांनी भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.
या भेटीत श्री. मित्रा यांनी सांगितले की मुख्यमंत्री साहेबांना या रस्त्याबाबत संपूर्ण माहिती असून, हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. मुख्यमंत्री साहेब १२ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथे येत आहेत आणि तेथे या विषयावर निर्णय होणार आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
त्यांनी पुढे सांगितले की आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता सरकार सकारात्मक पावले उचलणार असून, सद्यस्थितीत आंदोलन स्थगित ठेवावे अशी विनंती त्यांनी शिष्टमंडळास केली.
या रस्त्यावरील अपघात, रुग्णवाहिका सेवा अडथळे, विद्यार्थ्यांचा प्रवास यामुळे सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण तातडीचे असल्याचे शिष्टमंडळाने अधोरेखित केले.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली जिल्हा कोन्सिलतर्फे १५ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर येथील मुख्यमंत्री निवासस्थानासमोर आंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या खात्रीशीर आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित ठेवण्यात आले आहे.
शिष्टमंडळामध्ये कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा), कॉ. डॉ. युगल रायलू (जिल्हा सचिव, नागपूर), कॉ. अमोल मारकवार (माजी जिप सदस्य), कॉ. सुरज जककुलवार (AISF), कॉ. रवींद्र पराते (शहर सहसचिव, नागपूर) आदींचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments