गडचिरोली ,
गडचिरोली शहरातील सुप्रसिद्ध रेड्डी गोडावून चौक येथे अनेक वर्षांपासून भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरलेला दुर्गामाता उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. परंपरेला उजाळा देत यावर्षी नवशक्ती दुर्गा उत्सव मंडळ, रेड्डी गोडावून चौक, गडचिरोली यांच्या वतीने माता दुर्गेची स्थापना मोठ्या थाटामाटात पार पडली.
या पावन प्रसंगी पहिल्या आरतीचा मान माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांना लाभला. डॉ. नेते यांनी श्रद्धा व मनोभावे माता दुर्गेचे पूजन करून आरती केली आणि संपूर्ण जनतेस शुभेच्छा व्यक्त करत “समाजातील प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी, आनंद व आरोग्य लाभो” अशी मंगलकामना केली.
या वेळी कार्यक्रमाला सामाजिक नेते प्रकाशजी निकुरे, चंद्रशेखरजी साळवे, निलेश बोम्मनवार, सोनू ब्राम्हणवाडे, भाऊराव कुनघाडकर सर, धनंजय हिवसे, मनिष भुस्कुडे, पत्रकार निलेश पटले, विष्णु कांबळे, मुत्येलवार साहेब, नरेश हजारे, मनिष बानबले यांच्यासह शहरातील मान्यवर व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
रेड्डी गोडावून चौकातील दुर्गामाता उत्सव हा गडचिरोलीकरांच्या श्रद्धेचा आणि ऐक्याचा द्योतक ठरत असून, भक्तिभाव व सामाजिक बंधाची अनमोल परंपरा जपणारा असा हा उत्सव यावर्षीदेखील जनमानसात नवचैतन्य निर्माण करणारा ठरला.
0 Comments