मोहझरीत अंगणवाडीला नवी इमारत
मोहझरी येथे मार्गदर्शन करताना माजी पं. स. उपसभापती विलास दशमुखे व अन्य
गडचिरोली : अंगणवाडी हीच शिक्षणाचा खरा पाया आहे. याच वयात विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची ओढ निर्माण होते. अंगणवाड्यांमुळे मुलांना चांगल्या सवयी लागतात, असे प्रतिपादन माजी पं.स. उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले.
नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत मोहझरी येथील नवीन अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण २२ सप्टेंबरला
नवीन इमारतीत पोषण आहारसुद्धा सुरक्षित राहील.
झाले. यावेळी माजी पं.स. सभापती मारोतराव ईचोडकर, सरपंच सुनंदा दशमुखे, उपसरपंच आशा भोयर, ग्रामपंचायत सदस्य कृष्णा जांभूळकर, दीपाली लांबाडे, संतोष शेंडे, अंगणवाडी सेविका धारणे, लोमेश लांबाडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष भोयर, गुरुदेव झरकर, सचिन बोकडे, भास्कर भोयर, ग्रामसेवक शेंडे उपस्थित होते.
0 Comments