गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामे होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे निवेदन सादर

गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक कामे होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे निवेदन सादर
गडचिरोली,
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांना गडचिरोली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. रवींद्र भाऊ वासेकर, राज्याचे उपाध्यक्ष नानाभाऊ नाकाडे, प्रदेश सरचिटणीस युनुसशेख यांच्या सोबत नुकतीच मुंबई येथे सह्यांद्रीसभागृहामध्ये दादांना गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामा संबंधाने निवेदन देण्यात आले.
प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील शेतीला बारमाही सिंचन सुविधा निर्माण करण्यास वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द चा डावा कालवा निर्माण करून पाणी देण्यात यावा, ग्रामरोजगार सेवक यांना ३ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णय नुसार मानधन देण्यात यावे, देऊळगाव बरैजला मंजुरी प्रदान करण्यात यावी, तुलतुली, कारवापा धरणाच्या कामाला पुन्हा मंजुरी देऊन त्याची सुरवात करण्यात यावी, वडसा येथे नाट्य सभागृहास निधी उपलब्ध करण्यात यावी. अश्या विविध मागण्या संबंधाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली.
आदरणीय अजितदादा पवार साहेब तत्पर कार्यवाहीचा कार्यप्रणालीमुळे दादांनी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांना फोन करून गडचिरोली जिल्ह्यात बारमाही सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यास चर्चा केली तेव्हा दादांनी नवीन बरेज निर्माण करून बारमाही सिंचन सुविधा निर्माण करू असे आश्वासन दिले.
गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्याच कामाला पैसे कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. दादाचा वादा हा गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गतिमान ठरेल अशी अशा रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments