गडचिरोली महिला, बाल रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य स्वच्छतेचा अभाव - डॉ. आशिष कोरेटी

गडचिरोली महिला, बाल रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य स्वच्छतेचा अभाव -  डॉ. आशिष कोरेटी
गडचिरोली, 
जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालयात जिल्हाभरातील गोरगरीब महिला रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र, या रुग्णालयासह परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने रुग्णांसह नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालयात प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून स्वच्छता करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वजह (वन-जन हक्क) फाउंडेशनचे संस्थापक डॉ. आशिष कोरेटी यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील आदिवासी, गोरगरीब महिला तसेच बालकांना
योग्यवेळी उपचार मिळावे, यासाठी शासनाने कोट्यवधी रुपयांच्या निधीअंतर्गत गडचिरोली जिल्हा मुख्यालय भव्यदिव्य महिला व बालरुग्णालय उभारले. या रुग्णालयात गर्भवती महिला, नवजात शिशू, बालकांवर उपचार केले जात आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णालयासह परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, थुकीचे डाग, लोखंडी भंगार पडलेले आहेत. स्वच्छता गृहात अस्वच्छता पसरली आहे. स्वच्छता करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आशिष कोरेटी यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments