गडचिरोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्ट:अहेरी तालुक्यातील
नागरिकांनी सतर्क राहावे - माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार
नागरिकांना जेवणाची व्यवस्था करून देत राहण्याची सोय करून दिले.
आल्लापल्ली :
मुसळधार पावसाने आज आल्लापल्ली शहरात थैमान घातले.विशेषतः फुकट नगर वसाहतीत पावसाचे पाणी घरात घुसल्याने अनेक कुटुंबे घराबाहेर रस्त्यावर येण्याची वेळ आली.नागरिकांचे घरातील साहित्य भिजले असून जनजीवन पूर्णत विस्कळीत झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसनेते व माजी जि.प.अध्यक्ष मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी जिल्हा अध्यक्ष, आदिवासी सेल यांनी तात्काळ प्रतिसाद देत काल आल्लापल्ली ग्रामपंचायतचे माजी सरपंच अज्जूभाऊ पठाण यांच्याशी संपर्क साधून पूरग्रस्त कुटुंबांच्या तातडी पुनर्वसनाचे आदेश दिले.
त्यानुसार अज्जूभाऊ पठाण यांनी मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार व हनमंतू मडावी यांची आदेशाची पालन करीत आपल्या कार्यकर्त्यांसह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जिल्हा परिषद मुलांची प्राथमिक शाळा,आल्लापल्ली येथे नागरिकांसाठी सुरक्षित निवारा, जेवणाची आणि इतर मूलभूत सोयीसुविधांची व्यवस्था केली
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या तात्काळ मदतीचे व कार्यकर्त्यांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.दरम्यान, अजूनही काही भागांत पाणी साचल्याने नागरिक भयभीत असून प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अजय कंकडालवार यांनी आज थेट पूरग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्या नागरिकांना जेवणाची व्यवस्था करून देऊन राहण्याची सोय करून देत सवांद साधले,त्यावेळी कंकडालवारांनी समंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे पूरग्रस्त भागात लवकरत लवकर पंचनामे करून पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्यात यावी म्हणून सूचना दिले.
यावेळी अज्जूभैय्या पठाण माजी उपसरपंच आलापल्ली,कार्तिक तोगम माजी उपसरपंच,प्रशांत गोडसेलवार नगरपंचायत नगरसेवक अहेरी, प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,गंजीवार साहेब,प्रमोद गोडसेलवार,सचिन पांचार्या,प्रशांत सरकाटे,जावेद भाई,विशाल तोडसम,राजू दुर्गे,दिलीप सोनुले,चिंटू आत्राम,सतीश आत्राम,प्रवीण कोरेत,पिंटू मडावी स्थानिक आविसं,काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments