अवैध देशी दारू वाहतुकीवर बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई
३,९५,५००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर,
दिनांक २६ जून २०२५ रोजी पोलीस स्टेशन बल्लारपूर हद्दीत हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, चंद्रपूर ते बामणी-बल्लारपूर रोडवरून एका चारचाकी वाहनाने अवैधरित्या दारूची वाहतूक होणार आहे. या वरून बल्लारपूर पोलीसांनी नगर परिषद चौक, बल्लारपूर येथे पंच व स्टाफसह नाकाबंदी करून साधारणतः सायंकाळी ५.२५ वाजता, सिल्वर रंगाची Hyundai i20 कार (MH 34 AM 9673) थांबवून पाहणी केली असता सदर वाहनात सुनील महादेव मेश्राम रा. शिवाजी वार्ड बल्लारपुर व श्रीनिवास चंद्रया भीमगणी रा. बाबपेठ चंद्रपूर ही व्यक्ती मिळुन आली. त्यांचे समवेत पंचा समक्ष वाहनाची झडती घेतली तेंव्हा सदर वाहनात (१) २० नग खरडयाचे खोक्यात रॉकेट संत्रा कंपनिच्या ९० एम.एल देशी दारु ३५ रु. प्रमाणे -७०,०००/-रु.,
(२) ५०० नग रॉकेट संत्रा कंपनिच्या ९० एम.एल देशी दारु ३५ रु. प्रमाणे-१७,५००/-रु.
(३) एक विवो कंपनिचा क्रिम रंगाचा अॅड्राईड मो. फोन-५,०००/- रु., (४) विवो कपंनिचा काळया रंगाचा अॅड्राईड मो. फोन-५,०००/- रु., (५) सिल्वर रंगाची Hyundai i20 कार (MH 34 AM 9673) -३,००,०००/-रु. असा एकुण ३,९५,५००/- रु. किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन पो.स्टे. ला. अप कं. ४४४/२०२५ कलम ६५(अ), ८३ महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अन्वये गुन्हा नोदविण्यात आला आहे. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे.
सदर ची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी, राजूरा श्री. सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात बल्लारपूर पोलीस ठाणे चे पोलीस निरिक्षक श्री बिपीन इंगळे यांचे नेतृत्वात स.पो.नि. मदन दिवटे, पोउपनि. अभिषेक जंगमवार, सफौ. आनंद परचाके, पो.अं.सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, संतोष पंडीत, सुनिल कामतकर, प्रविण निकोडे, मोहन निषाद, पो. अंमलदार विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, गुरु शिंदे, सचिन राठोड, भास्कर चिचवलकर, मपोअं.अनिता नायडू, चामपोअं. विना येलपुलवार इत्यादी पो. स्टाफ यांनी केली आहे.
0 Comments