काकासाहेब कोयटे
गडचिरोली,
दी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली ही सहकार क्षेत्रात अग्रेसर असून या पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. अतिशय विश्वसनीय पतसंस्था म्हणून या पतसंस्थेचे ख्याती आहे, पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांनी गडचिरोलीच्या या पतसंस्थेला एकदा तरी भेट द्यावी अशा प्रकारचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य शाखा कार्यालयाचे नूतनीकरणाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर येथील श्री संत गजानन महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष स्वप्निल मोंढे, संस्थेच्या उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे , मानद सचिव सुलोचना वाघरे, जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष दिलीप खेवले. सहकार अधिकारी विजय पाटील, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जेष्ठ सदस्य अरुण मुनघाटे, पतसंस्थेचे ज्येष्ठ सदस्य पंडित पूडके आदी मंचावर उपस्थित होते
काकासाहेब कोयटे पुढे म्हणाले की, संस्थेचे नूतनीकरण झालेलं कार्यालय हे सर्व सोयीने सुसज्ज असून ग्राहकांना आकृष्ट करणार आहे. संस्थेच्या वार्षिक अहवालावरून पतसंस्थेतील एकूण ठेवीच्या तब्बल 38 टक्के ठेवी ह्या कमी व्याजदराच्या आहे, याचाच अर्थ या जिल्ह्यातील ग्राहकांचा या पतसंस्थेतील अध्यक्ष व संचालक मंडळावर प्रचंड विश्वास आहे. सहकारी खात्याच्या निकषाप्रमाणे एखाद्या पतसंस्थेचा स्वनिधी हा १० टक्के असायला पाहिजे. महाराष्ट्रातील फार कमी पतसंस्थेचा स्वनिधी हा १० टक्के किंवा थोडा फार त्याचे पुढे आहे, परंतु या पतसंस्थेचा स्वनिधी हा तब्बल 16.17% आहे. यावरून सहकार खात्याच्या निकषानुसार या पतसंस्थेचा आर्थिक पाया भक्कम असून या पतसंस्थेतील ठेवी ह्या अतिशय सुरक्षित असून ठेवींना कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे राज्याच्या पतसंस्था चळवळीच्या वतीने ठामपणे नमूद करीत असल्याचे ते म्हणाले.
प्रमुख अतिथी स्वप्निल मोंढे म्हणाले की, गडचिरोली सारख्या आदिवासी व नक्षलग्रस्त भागात आर्थिक दृष्ट्या भक्कम, ठेवींना संरक्षण, ग्राहकांचा प्रचंड विश्वास आणि सहकार खात्याच्या प्रत्येक निकषात तंतोतंत बसणारी दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था म्हणजे एक आदर्श पतसंस्थेचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणातून अनिल पाटील म्हशाखत्री म्हणाले की, या पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय खुशालराव वाघरे यांनी ठरवून दिलेल्या ढाच्या प्रमाणे पतसंस्थेची वाटचाल सुरू असून संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, पुढच्या काही दिवसात ही पतसंस्था अत्याधुनिक सोयींनी युक्त ग्राहकांच्या सेवेत रुजू होईल अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेची संचालक प्रा. शेषराव येलेकर यांनी केले तर संचालन भूषण रोहनकर व आभार पंडित फडके यांनी मानले. कार्यक्रमाला पतसंस्थेचे संचालक मधुकर कोटकले, दिलीप उरकुडे, पांडुरंग चिलबुले, मुकुंद म्हशाखेत्री, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव गोविंदराव बानबले, ज्येष्ठ सदस्य दादाजी चापले प्रा. मुकेश ऊरकुडे प्रा. विनोद चौधरी, नेटवींन सॉफ्टवेअर कंपनीचे उमाटे, दादाराव चौधरी आदीसह संस्थेचे व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे , फेडरेशनचे व्यवस्थापक भास्कर नागापुरे पतसंस्थेच्या सर्व शाखांचे शाखाधिकारी, कर्मचारी तसेच संस्थेचे हितचिंतक, कर्जदार, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments