रानटी हत्तीचा त्वरित बंदोबस्त करा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी उपसभापती विलास देशमुखे यांची मागणी

रानटी हत्तीचा त्वरित बंदोबस्त करा माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी उपसभापती विलास देशमुखे  यांची मागणी



गडचिरोली,
गडचिरोली तालुक्यातील नवरगाव येथे काल रात्री दीड वाजताच्या सुमारास रानटी हत्तीने शेतकऱ्यांच्या शेतासोबतच घरातील सामानाचे व धान्याची नासधूस केली त्यामुळे आता रानटी हत्ती हे जंगलापुरते मर्यादित न राहता गावामध्ये सुद्धा नुस्कान करीत आहेत  त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शासनाने त्वरित जंगली  हत्तीची बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभाचे क्षेत्राचे माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.
     आज नवरगाव येथे हत्तीने नुकसान केलेल्या भागाची पाहणी करण्याकरिता डॉक्टर देवरावजी होळी हे गेले असता शेतकऱ्यांनी व गावातील नागरिकांनी रोश व्यक्त केला. त्यावेळी माजी आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी ग्रामस्थांची समजूत काढत आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून त्यांचे ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना नुकसान  भरपाई मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून हत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे साखळ घालणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

   यावेळी माजी उपसभापती विलासभाऊ दशमुखे, सामाजिक कार्यकर्ते उमेश उइके, आवारी पो. पा, देविदास चुधरी, ब्रम्हणंद कोकीळ,  दादाजी दशमुखे,  मुकुंदा भोयर, हेमंत चुधरी, योगराज नंदेश्वर, वामन कोकीळ, आत्माराम शेलोटे, मधुकर भोयर, उत्तम चुधरी, तोताराम भोयर, देविदास चुधरी, देवाजी बोकडे, राजू अंबादे चेतन चुधरी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments