आदर्श महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रम संपन्न

आदर्श महाविद्यालयामध्ये  प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रम संपन्न       




देसाईगंज - 
नूतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित स्थानिक आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयात प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियाना अंतर्गत (PM-USHA) महाविद्यालयाला मंजूर नवीन इमारतीच्या  बांधकामाचे भूमीपूजन आरमोरी  विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार  मा. श्री  कृष्णाजी गजबे याच्या हस्ते करण्यत आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नूतन शिक्षण प्रसारक मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष जगदीशजी शर्मा, सचिव मा. मोतीलालजी कुकरेजा, सहसचिव ओमप्रकाश अग्रवाल, माजी प्राचार्य तथा संस्था सदस्य डॉ. शंकर कुकरेजा, कोषाध्यक्ष श्री योगेश नागतोडे, संस्था सदस्य मा संतुमल डोडानी, मा. जहीरभाई शेख, मा. डॉ. इंदरप्रित सिंह टूटेजा, मा. मा. प्रमोद चिलवे, मा. नानक कुकरेजा, सौ. साधनाताई सपाटे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. श्रीराम गहाणे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. दामोदर शिंगाडे प्रमुख्याने उपस्थितीत होते. भूमिपूजनाचे समारंभ भारतीय संस्कृतीच्या  विधी प्रमाणे  करण्यात आले.

प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत महाविद्यालयाला प्राप्त नवीन इमारत बांधकामाचे अनुदान महाविद्यालयाच्या विकासामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. या अनुदानांतर्गत महाविद्यालय परिसरामध्ये नवीन सुसज्ज सभागृह,  ग्रंथालय तथा व्यायाम शाळेचे बांधकाम करण्यात येणार आहे. या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि सर्व सुविधायुक्त उच्च शिक्षण मिळेल असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.

आदर्श महाविद्यालयातील नवीन इमारत बांधकाम भूमिपूजनाच्या या समारंभाला आदर्श महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तथा आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments