प्रथमच पुसेर भागातील अतिदुर्गम भागांना आमदार मिलिंद भाऊ नरोटे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांची मोटर सायकलने गाव भेट
आमदारांनी अतिदुर्गम भागात मोटरसायकलने फिरून सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या समस्या ऐकून लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले,
चामोर्शी
चामोर्शी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील पुसेर या शेवटच्या गावाला आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधीने भेट दिली नव्हती. मात्र प्रथमच आमदार डॉ. मिलिंद सगुणाबाई रामजी नरोटे यांनी या गावाला भेट देत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
या वेळी गावात ग्रामसभा भरवून गावातील विविध समस्या सविस्तर ऐकून घेतल्या गेल्या. रस्ते, वीज, आरोग्य, पाणी, शिक्षण, वनहक्क, शेती आणि रोजगार आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. नरोटे यांनी या समस्या तातडीने संबंधित विभागांकडे पोहोचवून लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आमदारांनी दुचाकीने जंगलातील विविध खडतर मार्गाने प्रवास करत गावाजवळील फळबाग प्रकल्पाची पाहणी केली. स्थानिकांनी लावलेली फळझाडे पाहून समाधान व्यक्त करत या प्रकल्पासाठी आवश्यक सहकार्य दिले जाईल असेही सांगितले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणयजी खुणे,
ग्रामसभा मुरांडा इलाका अध्यक्ष श्री. केशरी पाटील उसेंडी,
ग्रामपंचायत पावीमुरांडा सरपंच सौ. आतलाताई,
ग्रामसभा पुसेर अध्यक्ष श्री. नामदेव पाटील मठ्ठामी,
देवपूर ग्रामसभा अध्यक्ष श्री. देवास पाटील पोटावी,
तसेच श्री. सुधाकरजी दुग्गा, श्री. रामदासजी मडावी, श्री. सूरजजी पोटावी, श्री. विशालजी पोटावी
व अनेक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments