आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी जाणल्या ग्रामीण नागरिकांच्या समस्या

आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी जाणल्या ग्रामीण नागरिकांच्या समस्या

आमदार आपल्या दारी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एकाच दिवशी घोट परिसरातील अनेक गावांच्या घेतल्या भेटी


घोटः-
 गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. मिलिंद नरोटे त्यांनी आज आपल्या विधानसभा क्षेत्रातील गावांचा दौरा करून शासकीय अधिकाऱ्यासोबत गावाच्या विकासाचा व समस्यांचा आढावा घेतला.
आ.डॉ. मिलिंद नरोटे यांनी आमदार आपल्या दारी या संकल्पनेतून गावातील समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याच्या उद्देशाने विविध गावातील समस्या स्थानिक स्तरावरच सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. आज भेट दिलेल्या गावामध्ये विकासपल्ली, रेगडी, माडेआमगाव, मक्केपल्ली माल, मक्केपल्ली चक, चापलवाडा, शिमुलतला, श्यामनगर या विधानसभा क्षेत्रातील समस्या सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या मार्फत सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी विविध गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मनमोकळेपणे आ. डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढे मांडल्या. यातील अनेक समस्या शासकीय अधिकाऱ्या सक्षस तात्काळ सोडविण्यात आल्या काही समस्या लवकरात सोडण्यासंदर्भात सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

यावेळी विकासपली येधील नागरिकांनी बंद असलेली उपसा सिंचन योजना कार्यान्वित करा तसेच दिनाधरणाचे पाणी सिंचनासाठी १४ गावातील शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी आग्रहाची विनंती केली. यावर १४ गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरच उपायोजना करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यासह दौऱ्याप्रसंगी विविध गावातील नागरिकांनी घरकुल योजना, श्रावण बाळ निराधार योजनेची पेन्शन, घरकुल योजनेतील रेतीचा काळाबाजार, वाढीव पोल व विद्युत समस्या, बस सेवा, अनेक गावात बंद असलेल्या नळयोजना, ग्रामीण भागात रस्ते व पुलाचे बांधकाम, समाज भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत आ. डॉ. मिलिंद नरोटे यांना मागणी करण्यात आली. यावेळी आ. डॉ. मिलिंद नरोटे यांनी जनतेच्या विविध समस्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडवल्या व वरिष्ठ अधिकाऱ्याऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून जनतेच्या प्रश्नावर तात्काळ लक्ष देण्याच्या सूचना आ. हॉ. मिलिंद नरोटे यांनी केल्या या दौऱ्याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.

ऊपक्रमाचे कौतुक आमदार आपल्या दारी या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असुन सामान्य नागरिकांच्या अडचणी गाव स्तरावर आमदार व अधिकारी यांच्या समोर मांडून प्रश्न मार्गी लागून गावाच्या विकासात कोणती कमतरता आहे याबाबत चर्चा करून विकास कामांना गती मिळण्याची शक्यता असल्याचे मनोगत समान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे.

भरत खटी, मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, माजी जिल्हा परिषद सदस्य नामदेव सोनटक्के, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पोहनकर, नायब तहसीलदार राजेंद्र वैद्य, घोटचे मंडळ अधिकारी शिंपी, घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश्वर वाडीघरे, कृषी विस्तार अधिकारी डोंगरे, क्षेत्रसहाय्यक प्रभाकर इटकेलवार, तालुकाध्यक्ष राकेश सरकार, विलास ऊईके, किशोर देवतळे, सुरेश कामेलवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, किशोर कुंडू, रमेश अधिकारी, गिरिष उपाध्ये, अनिता रॉय, पत्रकार हेमंत उपाध्ये, सरपंच अमोल पुंगाटी, उपसरपंच शारदा तावाडे, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश पुंगाटी, तलाठी दुर्गाप्रसाद कोडापे, वनविभाग, महसूल, बांधकाम, कृषी विभाग, महावितरण, पोलिस विभाग व जिल्हा परिषद बांधकाम अधिकारी तसेच याप्रसंगी विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला गटाच्या सदस्य, प्रामसेवक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments