सोनार समाजाच्या महिलांचा स्नेहमिलन सोहळ
गडचिराेली : स्थानिक सोनार समाज संघटना गडचिरोलीतर्फे सोनार समाज महिलांचा हळदीकुंकू कार्यक्रम व स्नेह मिलन सोहळा रविवार १९ जानेवारीला चामोर्शी मार्गावरील ओपन स्पेसमध्ये पार पडला.
सर्वप्रथम संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सामुहिक हळदीकुंकू, मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळ व विविध कार्यक्रम घेण्यात आले. विजेत्यांना पारितोषिक देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी सोनार समाज महिला अध्यक्ष अल्का खरवडे, सचिव वृषाली हर्षे, सदस्य माया भोजापुरे, मंजुषा पालकर, शालिनी भरणे, स्नेहा डोमळे, सविता डोमळे, स्वेता भरणे, आरजु हाडगे, शुभांगी काळबांधे,प्रीति हर्षे,यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
0 Comments