गडचिरोलीतील भाजपा संघटनेच्या मजबुतीसाठी प्रवासी कार्यकर्त्यांचा अतुलनीय व सशक्त सहभाग:!
भाजपा प्रवासी कार्यकर्ता अर्चना कोर्चा व विनिता कुलसते यांचे या विधानसभा निवडणुकीत मोलाचे कार्य!-
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप संघटनेच्या कार्याची पाहणी आणि बुथस्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी मध्यप्रदेशहून आलेल्या प्रवासी कार्यकर्त्या अर्चना कोरचा आणि विनीता कुलस्ते यांनी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एक महिना संपूर्ण विधानसभेत प्रवास करून त्यांनी स्थानिक राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक समस्यांचा सखोल अभ्यास केला व संघटनेला भक्कम करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
संघटन मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलले,गडचिरोलीतील आदिवासी समाजातील समस्यांचा अभ्यास करत त्यांनी पक्षाच्या धोरणांचा जनसामान्यांपर्यंत प्रसार केला. प्रत्येक बुथवर जाऊन पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रभावी पद्धती राबवल्या,* *ज्यामुळे गडचिरोलीतील भाजपा संघटना अधिक गतिशील व सक्षम झाली.
असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ प्रणय भाऊ खुणे यांनी केले
स्थानिक पातळीवरील आदिवासी समाजाच्या प्रश्नांपासून ते शैक्षणिक अडचणींवर त्यांनी विशेष चर्चा केली. त्यांचे संवाद आणि निरीक्षणांतून तयार झालेला सविस्तर अहवाल पक्षाला गडचिरोलीच्या स्थानिक गरजा समजून घेण्यात उपयुक्त ठरणार आहे
एक महिन्याच्या अथक निवडणूक प्रचार कार्यानंतर, अर्चना कोरचा आणि विनीता कुलस्ते यांचे भाजपाअनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय महामंत्री माजी खासदार अशोक भाऊ नेते भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत भाऊ वाघरे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, प्रकाश भाऊ गेडाम, योगिताताई पिपरे,भाजपा गडचिरोली विधानसभा संयोजक रमेश बारसागडे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता ताई हिंगे, भाजपा बंगाली आघाडी जिल्हा संयोजक रमेश अधिकारी यांनी आभार मानले,अर्चना कोरचा आणि विनीता कुलस्ते यांनी गडचिरोली विधानसभेत केलेल्या कार्यामुळे भाजपा संघटनेला नवी ऊर्जा मिळाली आहे. त्यांचे नेतृत्व, तपशीलवार निरीक्षण, आणि समस्यांवर चर्चा हा गडचिरोलीतील पक्ष कार्यासाठी नवीन अध्याय नक्कीच ठरला आहे. यांचे माजी खासदार अशोकजी नेते यांच्याकडून काही दिवसा आधी त्यांना देण्यात आलेले स्मृतिचिन्ह त्यांच्या योगदानाचे प्रतीक आहे.
*यावेळी त्यांचे सोबत अहोरात्र निवडणूक प्रचार कार्य करणारे तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर यांचीही उपस्थिती होती.
0 Comments