ग्रामगितेच्या माध्यमातून संताचे विचार गावागावात पोहचले.श्री. प्रमोदजी पिपरे
गडचिरोली विधानसभा भाजपा संयोजक श्री. प्रमोदजी पिपरे यांचे वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांचा 56 व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्याने समरोपीय कार्यक्रमा मध्ये उपस्थित झाले व त्यांना आरतीचा मान मिळाला त्यांनी सर्वाना मार्गदर्शन केले.
गडचिरोली शहरातील अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा-रामनगर ता. जि. गडचिरोली येथे वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांचा ५६ वा पुण्यतिथी महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा-रामनगरच्या वतीने आयोजित करण्यात आला.
या पुण्यतिथी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात सामुदायिक प्रार्थना आणि ध्यानाचा कार्यक्रम झाला. यावेळी सामाजिक नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचा माजी खासदार अशोकजी नेते आणि आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे व इतर मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या समरोपीय कार्यक्रमात गडचिरोली विधानसभा भाजपा संयोजक श्री. प्रमोदजी पिपरे मार्गदर्शन करताना सांगितले कि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आचार विचार सर्व गावात पोहचवा,आपला परिसर स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे,राष्ट्रप्रेम आणि अध्यात्म जोपर्यंत आपल्या मनामनात रुजत नाही तो पर्यंत आपण सर्वागीण विकास करू शकणार नाही आणि आपण स्वतःचा विकास केला नाही तर गावाचा व समाजाचा विकास करून शकणार नाही. समुदायिक प्रार्थना ही काळाची गरज बनलेली आहे त्यामुळे आपल्यावर चांगले संस्कार होतात आणि सामुदायिक प्रार्थनामुळे स्वतःचा तसेच जगाच्या कल्याण करण्याची प्रेरणा या प्रार्थनेतून मिळते. त्यामुळे सर्व वयाच्या व्यक्तीने सामुदायिक प्रार्थना मध्ये उपस्थित झाले पाहिजे. असे प्रतिपादन श्री. प्रमोदजी पिपरे केले.
यावेळी प्रामुख्याने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनुसूचित जनजाती अशोकची नेते, आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे,माजी आमदार डॉ. देवरावजी होळी डॉ. नामदेवराव उसेंडी, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम,जिल्हा महामंत्री तथा माजी. नगराध्यक्ष न. प. गडचिरोली सौ.योगिता पिपरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गिताताई हिंगे, सामाजिक नेते सुरेशजी मांडवगडे,चंद्रशेखर भडांगे,जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, पुडके सर, तुम्मपल्लीवार जी, विठ्ठलराव गेडाम, चरणदास बोरकुटे, मधुकरराव भोयर, कवडुजी येरमे, राजेंद्र भरडकर, रामकृष्ण ताजने, संजयजी बर्वे, नामदेवराव शेंडे यांसह शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, बंधू-भगिनी आणि गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments