माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या उपस्थितीत बतकम्मा महोत्सव उत्साहात साजरा

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांच्या उपस्थितीत बतकम्मा महोत्सव उत्साहात साजरा.

अहेरी येथील पद्माशाली समाज बांधवांचा पुढाकार.!


अहेरी:- शारदेय नवरात्री मध्ये एकीकडे मनोभावे देवी मातेची पूजा,आराधना आणि साधना केली जाते.मोठ्या उत्साहात शारदा उत्सव आणि दुर्गा उत्सव व बतकम्मा उत्सव साजरा केला जातो.

 गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात तेलुगू भाषिक नागरिकांची संख्या मोठी आहे.येथील धार्मिक परंपरा दाक्षिणात्य परंपरेशी जोडलेली आहे.दरवर्षी साजरा होणारा बतकम्मा महोत्सव संपूर्ण जिल्ह्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो.नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
दरवर्षी दसऱ्याच्या एक दिवस आधी म्हणजे नवमीला बतकम्मा उत्सव आयोजित केला जातो."बतकम्मा" हे गौरीचे रूप मानले जाते.भाविकांच्या मते हा सण प्रामुख्याने महिलांच्या श्रद्धेशी संबंधित आहे.या दिवशी महिला विविध प्रकारची फुले गोळा करून भांड्यात फुलांपासून बतकम्मा देवीची प्रतिकृती तयार करतात.ही प्रतिकृती जितकी मोठी तितकी तिची जागा मोठी असते.बतकम्मा तयार केलेल्या प्रतिकृतीची मंदिरात नेऊन पूजा केली जाते.

स्थानिक अहेरी येथील पद्माशाली समाजाच्या पुढाकाराने मोठ्या उत्साहात बतकम्मा उत्सवाच आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी उपस्थित राहून बतकम्मा मातेची पूजा केली आणि तेथील महिला मंडळासोबत सामूहिक नृत्य करत आनंद द्विगुणीत केला.
यावेळी पद्माशाली समाज बांधवांना नवरात्री निमित्ताने शुभेच्छा दिल्या.त्यावेळी मोठ्या संख्येने पद्माशाली समाज बांधव व महिलावर्ग उपस्थित होते.!

Post a Comment

0 Comments