अहेरीचा ऐतिहासिक दसरा महोत्सव मोठ्या उत्सवात संपन्न
अहेरी :-
राजनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहेरीनगरात 250 वर्षापासून दसरा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले तसेच विविध कार्यक्रम यावेळी पार पडले आहे.
यावेळी जनसमुदायाला संबोधित करतांना राजे अंबरीश राव यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, अहेरी विधानसभा मागील पाच वर्षात विकासा पासून दूर झाले आहे. विद्यमान मंत्री हे स्वतःचा विकास करण्यात मग्न आहे मात्र जनतेला वाऱ्यावर सोडले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत तुम्ही पैसा आणि यंत्रणा कोणतीही ताकद लावा... जनतेच्या आशीर्वादाने निवडून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही. अहेरीतील प्रसिद्ध दसरा महोत्सवात राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी विरोधकांना सज्जड ईशारा दिला.
0 Comments