मुतनूर पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध. - मा. खा. अशोकजी नेते

मुतनूर पर्यटन स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध.  - मा. खा. अशोकजी नेते

श्रीक्षेत्र मूतनूर येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आनंदोत्सवाने आदिशक्ती माँ दुर्गा उत्सवाचे भव्य आयोजन.
डॉ,प्रणय भाऊ खुणे यांच्या पुढाकाराने ५० लक्ष रुपये स्वखर्चाने आदिशक्ती दुर्गामाता मंदिराची भव्य निर्मिती..

 






गडचिरोली :-  गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मौजा- मूतनूर येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी आयोजित आदिशक्ती दुर्गा माता उत्सवाचे आयोजन करत या निमित्याने भव्य महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन व बालिका पूजन माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते व डॉ.प्रणय भाऊ खुणे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाचे आयोजन खूणे कन्स्ट्रक्शन जिल्हा गडचिरोलीचे वतीने करण्यात आले. 
या निमिताने माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चा तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती चे अशोकजी नेते यांनी मुतनूर या  पर्यटन स्थळाला भेट देऊन या पर्यटन स्थळांची पाहणी करून मुतनूर हे ठिकाणी जंगलातील अतिदुर्गम भाग,सभोवतालच्या डोंगराळ भागात वसलेले नैसर्गिक रम्यात सुशोभित वातावरणात वसलेले गाव आहे.अशा या ठिकाणीचे विकास होने गरजेचे आहे.यासाठी या पर्यटन स्थळाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असे प्रतिपादन मा.खा.नेते यांनी या मुतनुर या स्थळाला भेट देऊन आदिशक्ती माँ दुर्गा मातेचे दर्शन घेत  मार्गदर्शन केले.
मुतनुर या ठिकाणी पन्नास लाख रुपये खर्च करून आदिशक्ती दुर्गा मातेचे भव्य मंदिराचे बांधकाम करण्यात येत आहे.याची पाहणी माजी खासदार अशोक जी नेते यानी केल्यानंतर लगेच या विषयी माहिती देतांना डॉ. प्रणय खुणे यांनी सांगितले या मंदिराचे बांधकामासाठी जयपूर येथून दगड मागवण्यात आले आहे, व राजस्थान येथील कोरीव मंदिर बांधकाम करणारे हस्त कारागीर यांची चमू लवकरच जिल्ह्यातील मूतनूर येथे येणार आहे.व सुशोभित मुर्ती व सौदयीकरण पर्यटन स्थळ निर्माण होईल.असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी प्रामुख्याने खुणे कंट्रक्शन कंपनीचे डॉ, प्रणय भाऊ खुणे, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारतजी खटी , डॉ मिलिंद भाऊ नरोटे, डॉ चंदा ताई कोडवते, खुणे कन्स्ट्रक्षण कंपनीचे राकेश भाऊ डोंगरवार , लोकेश भाऊ डोंगरवार,गोंदिया जिल्हा मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष,गुड्डू भाऊ खुणे , मानवधिकार संघटनेचे  राष्ट्रीय प्रवक्ता ज्ञानेद्र विश्वास, अजय भाऊ सोनुले दिवाकर गेडाम, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर , व पदाधिकारी कार्यकर्ते व प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील विविध आदिवासी ग्रामसभा अध्यक्ष व इलाका प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments