कार्मेल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक दिन उत्साहात
गडचिरोली : स्थानिक कार्मेल
हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये मुख्याध्यापक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील चिमुकल्यांनी याप्रसंगी फादर सीनोज सीबेस्टियन यांच्या स्वागतार्थ स्वागत नृत्य व बाहुल्यांचे नृत्य सादर करून आपली कला दाखविली तसेच या नृत्यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. यावेळी
फादर अनिश आणि उपप्राचार्य सिस्टर नॅन्सी टॉम एसएच उपस्थित होते. संचालन राशी तारडे, धनश्री बोरकर, गृष्मा कायरकर आणि अदिती त्रिपुरवार यांनी केले तर आभार करिश्मा गिरोले यांनी मानले. फादर सीनोज सिबेस्टियन यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिक्षकांनी सहकार्य
केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्मेल हायस्कूलमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
0 Comments