कामगार संघटनेचे सामाजिक नेते सुरेशजी मांडवगडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली - मा.खा.श्री.अशोकजी नेते


मा.खा.श्री.अशोकजी नेते यांची गडचिरोली रामनगर येथील किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे,तसेच कामगार संघटनेचे सामाजिक नेते सुरेशजी मांडवगडे यांच्या निवासस्थानी भेट घेतली.





गडचिरोली:
-गडचिरोली रामनगर येथील किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेशजी भुरसे तसेच कामगार संघटनेचे सामाजिक नेते ,सुरेशजी मांडवगडे ह्यांची अचानक पणे तब्बेत बिघडल्याचे कळल्याने आज बैलपोळा दिनी त्यांच्या रामनगर येथील निवासस्थानी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी भेट देऊन आपल्या आरोग्याची व तब्यतीची काळजी घ्यावी. असे भेटीदरम्यान सांगून रामनगर परिसरातील उदभवणाऱ्या विविध समस्या व अडीअडचणी जाणून घेत चर्चा करण्यात आली.यावेळी बैलपोळा च्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी निवृत्त मेजर कान्होजी लोहबंरे जी,युवा नेते संजय मांडवगडे, सामाजिक नेत्या मंदाताई मांडवगडे,  सोनीताई, नरेश पिपरे, सामाजिक नेत्या सौ. वनमाला ताई मुनंघाटे, लोंढोलीच्या रुखमाबाई बोदलकर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments