१४ सप्टेंबरला गडचिरोली येथे माळी समाजाचा तर चामोर्शी येथे ढीवर ,भोई व केवट समाजाचा मेळावा. मेळाव्याला मोठ्या संख्येने यावे समाज बांधव व आ डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराचे आवाहन.

१४ सप्टेंबरला गडचिरोली येथे माळी समाजाचा तर चामोर्शी येथे ढीवर ,भोई व केवट समाजाचा मेळावा.
मेळाव्याला मोठ्या संख्येने यावे समाज बांधव व आ डॉ. देवरावजी होळी मित्र परिवाराचे आवाहन.

गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त  अधिकारी कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार करणार.



गडचिरोली,
समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक १४ सप्टेंबर रोजी चामोर्शी येथे सकाळी ११ वाजता  ढिवर,भोई व केवट समाजाचा तर  गडचिरोली येथे दुपारी २ वाजता  माळी समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव व आमदार डॉक्टर देवराव जी होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

ढिवर,भोई व केवट समाजाचा मेळावा चामोर्शी येथे सकाळी ११ वाजता तेली समाजसभागृह बस स्थानक चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला असून याच दिवशी दुपारी २ वाजता गडचिरोली येथील गानली सभागृहामध्ये माळी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये गुणवंत विद्यार्थी व नवनियुक्त कर्मचारी अधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी  मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments