केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जनतेला लाभ मिळवुन द्या. -
इंजि.प्रमोदजी पिपरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
भाजपा धानोरा तालुका व शहर कार्यकारीणीची बैठक संपन्न
गडचिरोली:-
विधानसभा निवडणुकीमध्ये विजय संपादन करायचे असेल तर केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्य जनतेला लाभ मिळवून द्या.तसेच पंचायत समिती गण,नगर पंचायत,नगरपरिषद, ग्रामपंचायत येथे प्रभागनिहाय बैठका घ्या. शक्तीकेंद्रप्रमुख,बुथ प्रमुख यांनी प्रत्यक्ष बुथवर जावुन बैठकांच्या माध्यमातून घरोघरी जावुन मतदार संपर्क अभियान राबवा.असे आवाहन लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदजी पिपरे यांनी केले.
भारतीय जनता पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील धानोरा तालुका व शहराची कार्यकारीणी बैठक धानोरा येथील किसान भवन येथे संपन्न झाली.यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी विकासकामावर व राजकीय विषयांवर चर्चा केली.कार्यक्रमाचे समारोपिय मार्गदर्शन डॉ. नामदेव उसेंडी केले.
याप्रसंगी जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम,डॉ.नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते,तालुका अध्यक्ष लताताई पुंघाटे,जिल्हा उपाध्यक्ष शशिकांतजी साळवे,अनंत साळवे, विजय कुमरे,नगरसेवक संजय कुंडू, सुभाष धाईत,तालुका महामंत्री,सर्व आघाड्यांचे पदाधिकारी,शक्तिकेंद्रप्रमुख व बुथ कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments