जि.प. शाळांच्या वेळेत केलेला बदल पूर्ववत करा - विजय गोरडवार यांची मागणी.
गडचिरोली -
जिल्हा परिषद शिक्षण विभाग ( प्राथ.)मार्फत नुकताच सर्व शाळांना आदेश करण्यात आला आहे की, त्यात शाळांच्या वेळेत बदल करण्यात आलेले आहे. पूर्वी दुपार पाळीची शाळा सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत भरायची आणि शनिवारला सकाळी ७.०० ते १०.३० या वेळेत भरायची मात्र अलीकडे शिक्षण विभागा मार्फत आदेश काढून सूचना करण्यात आल्या की, सकाळ पाळीची ची शाळा ही सकाळी ९.०० ते १२.३० या वेळात भरवावी. मात्र पालकांमध्ये याबाबत नाराजी असल्याने ती शाळा पूर्वीप्रमाणेच भरविण्यात यावी. कारण शनिवारला सकाळच्या वेळी पहीली तासिका ही शारीरिक शिक्षण (पिटी) ची घेण्यात येत असते. मात्र ती शाळा सकाळी ९.०० वाजता भरविल्याने मुले घरून जेवणाचा वेळ असल्याने जेवण करून येत असतात. त्यामुळे शारीरिक शिक्षण (पीटी) तासिका घेणे अशक्य आहे त्याचबरोबर मुले सकाळी ९.०० वाजता जेवण करून आल्याने १२.३० पर्यंत शाळा असतो तेव्हा मुले जेवण करून आल्याने पोषण आहार मुलांना देताना अडचणीचे होणार आहे.त्यामुळे शाळांच्या वेळात सदर करण्यात आलेला बदल रद्द करून त्यापूर्वी प्रमाणेच भरविण्यात यावा या मागणीसह शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद (प्राथमिक विभाग) यांना निवेदन देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गडचिरोली शहराध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती नप. गडचिरोली. विजय गोरडवार, अमोल कुडमेथे, अजय कुकडकर, मल्लया कालवा, उमेश उईके, सतीश कुसराम आदींचा समावेश होता.
0 Comments