कोनसरी परिसरातही आता डिजिटल बँकिंग सुविधा

कोनसरी परिसरातही आता डिजिटल बँकिंग सुविधा

कोनसरी येथे मार्गदर्शन करताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार.


गडचिरोली ,

    गडचिरोली  जिल्हा मध्यवर्ती चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे शाखा सुरू करून डिजीटल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
गडचिरोली  जिल्हा मध्यवर्ती सहकारी
कोनसरी व परिसरातील लोकांनी आधुनिक बँकींग सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष प्रचित पोरेड्डीवार यांनी ७ जुलै रोजी केले.

कोनसरी या गावात बँकेच्या ५७वी शाखा सुरू झाली आहे. कोनसरी येथे बँकेची शाखा सुरू झाल्यामुळे कोनसरी व परिसरातील २२ गावांतील लोकांची गैरसोय टळणार आहे. बँकेने येथे ग्राहकांकरिता एटीएम, मोबाइल बँकींग, युपीआय, क्यु-आर कोड,

नमस्कार गडचिरोली

आरटीजीएस, एनईएफटी व पासबुक प्रिंटींग मशीनसारख्या अत्याधुनक सुविधा ग्राहकांकरिता उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

यानिमित्ताने ग्राहक संवाद कार्यक्रम पार पडला. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लि. सुरजागडचे संचालक कर्नल विक्रम मेहता, व्यंकटेशन राव, रामनाथ स्वामी, अमित काळे, बँकेचे संचालक बंडू फैलावार, अमोल गण्यारपवार व भैयाजी वाढई यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक बँकेचे सीईओ सतीश आयलवार यांनी केले. किरण सांबरे, शाखा व्यवस्थापक अरविंद गव्हारे आदि उपस्थित होते. आभार राजू सोरते यांनी मानले.

Post a Comment

0 Comments