आदिवासी महिला प्रश्नावर के. राजू यांच्याशी चर्चा - प्रदेश उपाध्यक्षा कुसूमताई अलाम

आदिवासी महिला प्रश्नावर के. राजू यांच्याशी चर्चा -
प्रदेश उपाध्यक्षा कुसूमताई अलाम



गडचिरोली,
एसटी एससी ओबीसी अत्पसंख्याक समितीचे काँग्रेस अध्यक्ष के. राजू याच्याशी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत काँग्रेसच्या निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा कुसूम अलाम यांनी आदिवासी महिला प्रश्नावर निवेदन देऊन चर्चा केली.
निवेदनात त्यांनी जमीन, नैसर्गिक साधनसंपत्ती क्षेत्रातील आदिवासी महिलांवरील हिंसाचाराच्या प्रमाणाचा अभ्यास करणे, सामाजिक, राजकीय सांस्कृतिक आर्थिक आरोग्य, शैक्षणिक स्थितीचा अभ्यास करणे, भालचंद्र मुणगेकर अहवाल २००९ ची अंमालबजावणी करणे,

मणिपूर मधील हिंसाचार थांबवणे, विस्थापित बाधितांसाठी लोक आयोग स्थापन करणी, केंद्र व राज्य आयोगात आदिवासी महिलांचा समावेश करणे, आदिवासी बजेट पैकी ४० टक्के स्वतंत्र महिलाबजेट देण्यात यावे, आदिवासी मातृभाषा शिक्षण, आदिवासी भागात अधिक शाळांची स्थापना, महुआ प्रक्रिया

जतन, उत्पादन संख्या सुरू करणे यासह अनेक मागण्या त्यांनी निवेदनातून केल्या आहेत. यावेळी आदिवासी कॉग्रेसचे केंद्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे, अॅड. सुमित रामरामे आदिवासी विकास परिषद वकील विभागाचे अध्यक्ष होते.

Post a Comment

0 Comments