देसाईगंज तालुक्याततील अतिवृष्टीमुळे झालेल्या राहत्या घरांची नुकसानीची - आमदार कृष्णा गजबे यांनी केली पाहणी

देसाईगंज तालुक्याततील अतिवृष्टीमुळे झालेल्या राहत्या घरांची नुकसानीची आमदार कृष्णा गजबे यांनी केली पाहणी




आरमोरी:- 
मागील काही 10 , 12  दिवसांपासून देसाईगंज तालुक्यामध्ये पावसाची संतत धार सुरू आहे. याचा फटका अनेक घरांना बसला असुन घरांच पडझड झाली आहे. दरम्यान आज दिनांक २८ जुलै २०२४ रोजी आमदार कृष्णा गजबे यांनी देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव येथील श्री. मनोहर नाकतोडे, योगराज काळबांधे, दुधराम गुरणुले यांच्या नुकसानग्रस्त राहत्या घरांची पाहणी केली. यावेळी आमदार कृष्णा गजबे यांनी महसूल विभागाच्या अधिकार्यांना दूरध्वीद्वारे संवाद साधुन पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून घेत तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सूचना केल्यात.

यावेळी मन्साराम दोनाडकर, रमेश गरमले, देवानंद बारकर, मनोहर नाकतोडे, अनिल जुगनाके, महादेव मुंडरे, प्रेमदास जौंजारकर व नागरीक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments