गडचिरोली वनवृत्त कार्यालय आणि नगरपालिका येथे वनविभागाचे वनमहोत्सव केंद्र सूरू

गडचिरोली वनवृत्त कार्यालय आणि नगरपालिका येथे वनविभागाचे वनमहोत्सव केंद्र सूरू





गडचिरोली,
आज 1 जुलै रोजी कृषी दिन तसेच वृक्षलागवड सप्ताहाचे औचित्य साधून मुख्य वन संरक्षक कार्यालय आणि नगर परिषद गडचिरोली  येथे गडचिरोली प्रादेशिक वनविभाग व सामाजिक वनीकरण विभाग गडचिरोली, यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सव कालावधीत रोपे विक्री साठी वन महोत्सव केंद्र सुरू करण्यात आले..

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली  वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक श्री. एस. रमेशकुमार, गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. मिलिश दत्त शर्मा, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्री. गणेशराव झोळे, विभागीय वन अधिकारी दक्षता, श्री. गणेश पाटोळे तसेच गडचिरोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. सूर्यकांत पिदुरकर हे उपस्थित होते.

केंद्र शासनाच्या वतीने सन 2024-25 मध्ये एक पेड मां के नाम (Plant4mother) हि योजना तसेच राज्य सरकारच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी  योजना दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाच्या रोपवाटीकांमध्ये सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन मुख्य वन संरक्षक श्री एस. रमेशकुमार यांनी केले.

देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार एक पेड मां के नाम योजना यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे असे आवाहन उपवनसंरक्षक श्री मिलीश दत्त शर्मा यांनी केले.

वृक्षतोडीमुळे होत असलेल्या हवामान बदलांमुळे वाढत असलेली उष्णता आणि अनियमित पाऊस यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. त्यासाठी झाडे लावणे आणि वनांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे.  असे प्रतिपादन विभागीय वन अधिकारी श्री गणेश झोळे यांनी केले.

एक पेड मां के नाम आणि अमृत वृक्ष आपल्या दारी* योजनेअंतर्गत स्थानिक 15 महिलांना सीताफळ वृक्षांचे वाटप करण्यात आले. वन महोत्सव कालावधीत 9 महिन्यांची तसेच 18 महिन्यांची रोपे सवलतीच्या दरात निम्म्या किमतीत उपलब्ध आहेत. लागवड केलेल्या रोपांची माहिती  अमृतवृक्ष  या मोबाईल ॲप वर भरण्यासाठी शासनातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

सदर कार्यक्रम गडचिरोली (प्रादे) वन वृत्ताचे मुख्य वन संरक्षक श्री एस. रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अरविंद पेंदाम आणि धीरज ढेंबरे यांनी पूर्ण केला. कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी गडचिरोली सामाजिक वनिकरण परिक्षेत्रातील व गडचिरोली (प्रादे) वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments