चनकाई नगर गडचिरोली येथील सांड पाण्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावा. आमदार डॉ देवराव जी होळी यांनी परिसराची केली पाहणी.

चनकाई नगर गडचिरोली येथील सांड पाण्याची योग्य मार्गाने विल्हेवाट लावा.
   आमदार डॉ देवराव जी होळी यांनी परिसराची केली पाहणी.

स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार नगर परिषद प्रशासनाला दिले निर्देश.
निर्देश देताच घटनास्थळी पोहचले नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी.


गडचिरोली,
   गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रांतर्गत असणाऱ्या चनकाई नगर येथे  नाल्यांची योग्य व्यवस्था जुळलेली नसल्याने पावसाचे पाणी व सांडपाणी  लोकांच्या घरांमध्ये घुसले . यामुळें नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून या पाण्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता वाढली आहे त्यामुळे  ही बाब चनकाई नगर वासियानी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांना अवगत करून दिली व याबाबत तातडीने मार्ग काढण्याची मागणी केली असता  आमदार डॉ देवरावजी होळी यांनी तात्काळ   चनकाई  नगरला भेट देऊन परिसराची पाहणी केली व यांबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश नगरपरिषद प्रशासनाला  दिले.

निर्देश मिळताच  नगर परिषद प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम सूरू केले.

यावेळी स्थानिक नागरिक डंबाजी मस्के, मंदाबाई भोयर, वासुदेव नैताम, गौराबाई भांडेकर, मीनाक्षी जेंगठे,  नामदेव सुरणकर, सुनीता सुरणकर, किरण जेंगठे  आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments