डॉक्टर मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चाचे जिल्हा प्रभारी म्हणून निवड

डॉक्टर मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चाचे जिल्हा प्रभारी म्हणून निवड


गडचिरोली :- येथील नामांकित स्पंदन फाउंडेशनचे संचालक
डॉक्टर मिलिंद नरोटे यांची भारतीय जनता पार्टी गडचिरोली व आदिवासी आघाडी मोर्चाच्या प्रभारी म्हणून निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी डॉक्टर मिलिंद जी नरोटे यांना नियुक्तीपत्र देऊन जिल्हा उपाध्यक्ष व आदिवासी आघाडी मोर्चा जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती केली. त्यांना नियुक्तीपत्र देताना उपस्थित जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे, किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, ओबीसी मोर्चा जिल्हाअध्यक्ष अनिल पोहनकर, जिल्हा उपाध्यक्ष चेतन जी गोरे, शहर महामंत्री विनोदजी देवोजवार, भैय्याजी शुदलवार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments