कुरखेडा शहरा जवळच्या सती नदीवरील पूल बांधकामासाठी इतर मार्गाने वाहतुक न वळवता वळण मार्गाचे मजबूत बांधकाम करुन त्याच मार्गाने रहदारी सुरू ठेवण्याची आमदार कृष्णा गजबे यांची जिल्हयाचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे मागणी

कुरखेडा शहरा जवळच्या सती नदीवरील पूल बांधकामासाठी इतर मार्गाने वाहतुक न वळवता वळण मार्गाचे मजबूत बांधकाम करुन त्याच मार्गाने रहदारी सुरू ठेवण्याची आमदार कृष्णा गजबे यांची जिल्हयाचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या कडे मागणीगडचिरोली:- काल दि. २२ जुन रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी मतदार संघातील कुरखेडा व कोरची तालुका संपर्कासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या कुरखेडा शहराजवळ सती नदिवर बांधण्यात येत असलेल्या पुलामुळे निर्माण झालेल्या समस्येकडे मा. पालकमंत्री मंत्री महोदयांचे लक्ष वेधले. त्यावर जिल्हाधिकारी गडचिरोली व कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी तातडीने पाहणी करून एक आठवड्यात उपाययोजना करण्याचे पालकमंत्री महोदयांनी निर्देश दिले.*

आरमोरी मतदार संघातील कुरखेडा तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ५४३ वरील कुरखेडा शहरा जवळील सती नदीवर एक मोठा पूल बांधण्यास रस्ते, वाहतूक व महामार्ग विभागाने मंजुरी दिली आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देऊन पुलाचे बांधकाम नुकतेच सुरु करण्यात आले आहे. पुलाच्या बांधकामासाठी जुना पूल पाडून नागरिकांच्या रहदारीसाठी तात्पुरता वळणमार्ग तयार करण्यात आला आहे. हा रस्ता गोठणगाव, पुराडा, मालेवाडा आदी आदिवासी, दुर्गम गावांना कुरखेडा तालुका मुख्यालयाशी जोडतो आणि कोरची व कुरखेडा तालुक्यांना गडचिरोली जिल्हा मुख्यालयाशी जोडतो. त्यामुळे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा, बारमाही आणि दळणवळणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून बांधण्यात आलेला वळणमार्ग अत्यंत कमी उंचीचा व त्यामध्ये पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात आलेले पाईप कमी व्यासाचे आहेत कुरखेडा व परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस येवून सती नदि दुथडी भरुन वाहत असते. पावसाळा सुरु होताच संपूर्ण वळणमार्ग वाहुन जाईल आणि नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. याकरीता राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळविण्याची विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दि. २२ जुन २०२४ ला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांचे पत्राद्वारे सदर महामार्गावरील वाहतुक इतर मार्गावरुन वळविण्याचे आदेश दिलेले आहेत.

तथापी इतर पर्यायी मार्ग लांब अंतराचे असुन नागरीकांच्या श्रम, वेळ व पैशाचा अपव्यय होऊन  नागरीकांची प्रचंड गैरसोय होईल. तसेच पुल बांधकामाची गती लक्षात घेता बांधकाम पुर्ण होईपर्यंत आणखी कीती कालावधी लागेल याची खात्री नसल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी बांधकाम सुरु असलेल्या पुलाच्या बाजुनेच वळणमार्गाने पावसाळ्यातही वाहतुक सुरु राहावी यासाठी वळण मार्गाची उंची वाढवुन पाणी वाहून जाण्यासाठी मोठ्या व्यासाचे पाईप टाकून वळणमार्गाचे मजबुत बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली.

सदर मागणीची पालकमंत्री महोदयांनी दखल घेत जिल्हाधिकारी गडचिरोली व  कार्यकारी अभियंता, रा.म. विभाग, गडचिरोली यांना कुरखेडा येथे पुल बांधकाम स्थळाची पाहणी करून जड वाहतूक वगळता कोरची व कुरखेडा तालुक्यातील नागरीकांना त्याच मार्गाने रहदारी करता येईल अशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

Post a Comment

0 Comments