आ. गजबेंच्या नेतृत्वात महामार्ग अभियंत्यांना घेराव

आ. गजबेंच्या नेतृत्वात महामार्ग अभियंत्यांना घेराव


कुरखेडा,
कुरखेडा - सतीनदीच्या पूलाचे बांधकाम संथगतीने सूरू असल्याने उदभवणाऱ्या संभाव्य परीस्थीचा अंदाज घेत आज शुक्रवार रोजी आ. कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात संतप्त शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरीकानी बांधकामस्थळीच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता लिंगावार यांना घेराव घालत रखडलेल्या बांधकाम तसेच बांधकामाच्या दर्जाबाबत जाब विचारत तिव्र शब्दात रोष प्रकट केला.
सतीनदीवरील जूना मात्र व्यवस्थीत असलेला पूल तोडत जवळपास सहा महिण्यापूर्वी नविन पूलाच्या बांधकामाची सूरवात करण्यात आली. मात्र संबंधित
कंत्राटदाराकडून कामाला अपेक्षीत गती देण्यात न आल्याने तसेच काही तांत्रिक अडचणीने दोन महिणे काम बंद राहील्याने काम रखडले. पावसाळा जवळ येऊनही पिल्लरचे सूद्धा काम पूर्ण झाले नाही. जोरात पाऊस येताच तयार करण्यात आलेला पर्यायी रपटा वाहून जाणार आहे. यानंतर नदीपलीकडील तालूक्यातील गावांचा तालूका मूख्यालयाशी संपर्क तुटणार
आहे. या मार्गावरील बस सेवा तसेच इतर वाहतूक व्यवस्था सूद्धा बंद होणार असल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. संबंधित विभागाचा तसेच कंत्राटदाराच्या नियोजन शून्यतेमूळे ही परीस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप यावेळी नागरीकांनी केला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपविभागीय अभियंता लिंगावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता अनिल जगनाळे यांना घेराव घालत त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments