साेनार समाज महिलांनी केला सावित्रीबाईंचा कार्याचा जागर

साेनार समाज महिलांनी केला सावित्रीबाईंचा कार्याचा जागर

गडचिराेलीत मेळावा : बांगड्या, संगीत खुर्ची, बाजीराव मस्तानी स्पर्धा


गडचिराेली : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहरातील साेनार समाजाच्या वतीने महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. याप्रसंगी महिलांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा जागर केला. कार्यक्रमाला साेनार समाज महिला कार्यकारिणीच्या अध्यक्ष अलका खरवडे, महिला सचिव वृषाली हर्षे, सदस्य सविता डोमळे, अश्विनी चावरे, मनीषा पालकर, शुभांगी काळबांधे, स्नेहा डोमळे, श्वेता भरणे, शालिनी भरणे, आरजू हाडगे, माया भोजापुरे, लतिका काळबांधे, विमल करंडे, वृंदा हाडगे, शैला खरवडे, कल्पना काळबांधे, सुनंदा खरवडे, सरिता खरवडे, दीपाली नागरे, अर्चना काळबांधे, दर्शना डोमळे, मयुरी खरवडे, वैशाली करंडे, नीलेश्वरी इनकने, शारदा काळबांधे, छाया डोमळे, छाया हर्षे, कुंदा कारेमोरे, वैशाली बांगरे, भाग्यश्री काळबांधे, भारती इंगुलकर, प्रीती हर्षे, शीतल नागरे, सुषमा बेहरे, ममता रोकडे, प्रमिला हाडगे, वैशाली भजने, रेखा हर्षे आदी उपस्थित हाेत्या.

कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या बांगड्या गेममध्ये प्रथम स्नेहा डोमळे, द्वितीय क्रमांक दीपाली नागरे यांनी पटकावला. संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक आरजू हाडगे, द्वितीय सुनंदा खरवडे तसेच बाजीराव मस्तानी गेममध्ये प्रथम शुभांगी काळबांधे तर दीपाली नागरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.

Post a Comment

0 Comments