हेडरी येथील लॉयड्सच्या रूग्णालयात प्रथम जन्माचा आनंद

हेडरी येथील लॉयड्सच्या रूग्णालयात प्रथम जन्माचा आनंद

लॉयड्स मेटल्सचे मॅनेजिंग डायरेक्टर बी. प्रभाकरन यांनी केले जोडप्याचे अभिनंदन


गडचिरोली - एटापल्ली

तालुक्यातील हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २९ जानेवारी रोजी पहिल्या बाळाचा जन्म साजरा करण्यात आला.
बोडमेट्टा गावातील अजय राजेश मिंज आणि बाली मिंज या दाम्पत्याच्या पोटी रूग्णालयात प्रथम बाळाचा जन्म झाला.
लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे एमडी बी. प्रभाकरन यांनी हॉस्पिटलला भेट दिली आणि कुटुंबाचे अभिनंदन केले. लॉयड्स इन्फिनिट
फाउंडेशनने त्यांच्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत स्थापन केलेल्या एलकेएम हॉस्पिटलचे एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे ८ डिसेंबर २०२३ रोजी उद्घाटन करण्यात आले. एटापल्ली तालुक्यात वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे. यामुळे कंपनीच्यावतीने ३० खाटांचे मल्टी स्पेशालिटी एलकेएम हॉस्पिटल सुरू केले. हे
हॉस्पिटल आसपासच्या गावकऱ्यांच्या वैद्यकीय गरजा पूर्ण करते. रूटीन तसेच आपत्कालीन प्रकरणे हाताळण्यासाठी
अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असलेले रुग्णालय, तज्ञ डॉक्टर आणि भेट देणाऱ्या सल्लागारांच्या समर्पित टीमद्वारे चालविले जाते. या रूग्णालयाचा परीसरातील नागरीकांना फायदा होईल असे मत एम.डी. प्रभाकरन
यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments