कोरोना प्रोत्साहन भत्याकरीता अंगणवाडी महिलांचा आक्रोश - कॉ. दहीवडे,

कोरोना प्रोत्साहन भत्याकरीता अंगणवाडी महिलांचा आक्रोश  - कॉ. दहीवडे,गडचिरोली : कोरोना काळात ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी महिला तसेच आशा वर्कर कडून काम करवून घेण्याकरीता एक हजार रुपये प्रतिमा प्रोत्साहन भत्ता देण्याची राज्य शासनाचे वतीने घोषीत करण्यात आले. त्या नुसार शासन परीपत्रक काढले असले तरी १९ महिने काम करवून घेण्यात आले. मात्र केवळ एक महिण्याचे १००० रुपयेच देण्यात आले. अशी टीका काॅ. रमेशचंद्र दहीवडे यांनी केली.     

         राज्य शासनाच्या फसवेगीरीच्या विरोधात गडचिरोली जिल्हा परीषदे समोर अंगणवाडी महिलांचा विशाल धरणे आंदोलन सिटूच्या नेतृत्वात करण्यात आला. फसवेगीरी बंद करा, कोरोना प्रोत्साहन भत्ता मिळालाच पाहीजे, वेठबीगारीचा निषेध असो, केलेल्या कामाचा मोबदला मिळालाच पाहीजे, अशा घोषणा देण्यात आल्या. 

यामुळे मार्गदर्शनपर भाषणात कॉ. अमोल मारकवार म्हणाले की,  आश्वासन दयायचे आणी काम करवून घ्यायचे, मोबदला देण्याची वेळ आली तर तोंडाला कुलूप लावायचे, असा एक कलमी कार्यक्रम या शासनकर्त्यांचा आहे. प्रा. दहीवडे म्हणाले,  तोंड चालाकी करुन जनतेला किती काळ फसविणार याचा जाब विचारण्या करीता आम्ही येथे आलो आहोत.  कॉ. प्रमोद गोडघाटे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ  मुख्यकार्यपालन अधिकारी यांना भेटले व मागण्यांचे निवेदन सादर केले. कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता तात्काळ दया, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागु करा, सेवानिवृत्त अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा, थकीत टि.ए. तथा डी.ए. तात्काळ देण्यात यावे आदि मागण्यांचा समावेश होता.
         विठाबाई भट यांच्या आभारप्रदर्शनाने धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली. सदरचे धरणे आंदोलन यशस्वी करण्या करीता सुशिला कार, रंजना चौकुंडे, विमल कमरो, शशिकला कोनटे, भागीरता दुधबावरे, सुमन तोकलवार, भारती रामटेके, विद्या निंब्रड यांनी विशेष परीश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments