काँग्रेसचे धो-धो पावसात 'थाळी बजाओ' आंदोलन "गो मलेरिया गो- पालकमंत्री दो

काँग्रेसचे धो-धो पावसात 'थाळी बजाओ' आंदोलन
"गो मलेरिया गो- पालकमंत्री दो

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्याचा प्रशासनाने केला .


गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या प्रशासन व शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच हजाराहून अधिक मलेरियाचे रुग्ण आढळले. तर मागील चार दिवसात १० नागरिकांना अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने धो-धो पावसात जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळी वाजवून 'गो मलेरिया गो, पालकमंत्री दो' आंदोलन केले.

जिल्ह्याच्या आरोग्य विभागात अनेक पद रिक्त आहेत. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे आरोग्यसेविका व कर्मचारी उपलब्ध नाही. अजूनही अनेक गावांत औषधीसाठा, गोळयांचा पुरवठा झालेला नाही. दरवर्षी पावसाळ्यात जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा निष्क्रिय कारभार पुढे येते अपुऱ्या व्यवस्थेमुळे

अनेक नागरिकांना आपला जीव गममावा लागते. तरीही शासन, प्रशासन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यावर तत्काळ उपाययोजना करावी, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील अनेक उप जिल्हा रुग्णालयामध्ये बऱ्याच सुविधांचा अभाव आहे, कोरोनाकाळात अनेक उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट लावण्याकरिता टेंडर काढण्यात आले. मात्र काम पूर्ण न झाल्याने अनेक प्लांट धूळ खात आहेत. त्यांची सुद्धा तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, रिक्त पदांची भरती करावी, यासह विविध मागण्यांना घेऊन आंदोलन केले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. विश्वजीत कोवासे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments