नित्कृष्ठ काम करणाऱ्या 'त्या' ठेकेदारावर कारवाई कधी होणार....? सामाजिक कार्यकर्ता संतोष ता्टीकोंडावार यांचा सवाल.....
'त्या' ठेकेदाराला वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभारणार
अहेरी,
अहेरी उपविभागात पेरमिली व अहेरी येथे नविन पुरणबांधणीचे काम सदोष असल्याने जनतेला व शाळकरी विद्यार्थांना मोठा त्रास होत आहें. पेरमिली येथे 39 कोटी रुपयाचे नविन उपकेंद्राचे बांधकाम सुरु आहे. सध्या सुरु असलेल्या बेसमेंटचे बांधकाम अति निकृष्ठ दर्जाचे झालेले असल्यामुळे सदर काम दबत आहे. अहेरी मध्ये सुध्दा अंदाजीत 7 ते 9 कोटीचे रुपयाचे बांधकाम अति निकृष्ठ दर्जाचे सुरु असुन आतमधील क्रॉक्रीट रस्त्याचे काम सलाखी योग्य रित्या न लावता व खाली 80 mm च बोल्डर सोलींग न करता निकृष्ठ दर्जाचे काम सुरु आहे. तरी या निकृष्ट कामाची चौकशी करण्याबाबतचे निवेदन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना संतोष ताटीकोंडावार भ्रष्टाचार निवारण समिती गडचिरोलीचा जिल्हाध्यक्ष यांनी दिले होते..सदर गंभीर बाबीची तक्रार मुख्यमंत्री तसेच बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा करण्यात आली होती. परंतु यावर 'त्या' ठेकेदाराच्या निकृष्ट बांधकामाची कोणतीही दखल घेतली नाही व ठेकेदाराच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे पाणी कुठे मुरते हे समजेनासे झाले आहेत. या भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई न केल्यास संबंधित विभागाच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा ईसारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी दिला आहे.
0 Comments