समाजसेवेच्या आधारावर जनता मनापासून पाठिशी : शीतलताई सोमनानी - वैरागड - मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारीची मागणी

वैरागड - मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातून उमेदवारीची मागणी

समाजसेवेच्या आधारावर जनता मनापासून पाठिशी : शीतलताई सोमनानी




आरमोरी / वैरागड : ग्रामपंचायत सदस्य म्हणून राजकारणात पहिले पाऊल टाकलेल्या शीतलताई सोमनानी यांच व्यक्तिमत्त्व आज संपूर्ण वैरागड-मानापूर परिसरात आदर्शवत ठरत आहे. सामाजिक बांधिलकी, प्रामाणिक कार्य आणि सर्व समाजाशी समान सन्मानाने वागणूक या गुणांमुळे त्यांनी स्थानिक जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. "समाजसेवा हीच ईश्वरसेवा" या तत्त्वाला केंद्रस्थानी ठेवून शीतल ताईनी व त्यांच्या कुटुंबाने अनेक वर्षांपासून निरलस,

मनोभावे सेवा दिली आहे. गरजूंना मदत, महिलांना सक्षम बनवणं, तरुणांसाठी मार्गदर्शन, वृद्धांसाठी सहकार्य आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्याचं त्यांच कार्य उल्लेखनीय ठरत आहे. शीतलताई कोणत्याही जाती, धर्म, पंथ, वर्ग, पक्ष यांच्यामध्ये भेदभाव न करता सर्वांसोबत संवाद ठेवतात, हीच

त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच, वैरागड मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील जनतेमध्ये आता एक स्पष्ट भावना आहे "शीतल ताईना पक्षाच्या तिकिटाची गरज नाही, त्यांच्या नावावरच विजय निश्चित आहे. "स्थानिक स्तरावर अनेकांनी आता खुलेआम मागणी केली आहे की, शीतल ताईनी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत आपली उमेदवारी जाहीर करावी. कारण ही लढाई केवळ राजकारणाची नसून, ती चांगल्या व्यवस्थापन, पारदर्शकतेच्या आणि सेवा भावनेच्या मूलभूत मूल्यांची आहे. असे वैरागड मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील जनसामान्यांच्या मनात शितलताई विषयी आदराच्या भावना निर्माण होत आहेत.

Post a Comment

0 Comments