अक्षय भालेराव च्या मारेकऱ्यांना शिक्षा करा - रजनीकांत मोटघरे


अनुसूचित जाती विभाग काँग्रेस  गडचिरोलीच्या वतीने मागणी


गडचिरोली:: 
नांदेड जिल्ह्यातील बोडार गावातील तरुण अक्षय भालेराव यांनी आपल्या गावात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली या कारणावरून जातीय देशातून गावातील काही जातीयवादी तरुणांनी एक जून 2023 रोजी अक्षय भालेराव या तरुणाची हत्या केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर आणि पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आताही जातीयवादी कारणातून अशा प्रकारे हत्या होत असेल तर हे महाराष्ट्रासाठीच नाहीतर संपूर्ण देशासाठी ही निंदनीय बाब आहे ही बाब लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महोदयांनी नांदेड जिल्ह्यात घडलेल्या अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा करावी व यापुढे असे जातीयवादी कृत्य घडू नये यासाठी प्रयत्न करावे व स्वर्गीय अक्षय भालेराव या तरुणाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अनुसूचित जाती विभाग काँग्रेस च्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत ने मुख्यमंत्र्यांना करण्यात आलेली आहे. 
यावेळी निवेदन देताना अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, तालुका अध्यक्ष वसंत राऊत, NSUI अध्यक्ष गौरव आलाम, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष जितेंद्र मुनघाटे, सुधीर बांबोडे, निकेश कमिडवार,  निलेश गेडाम, ज्ञानेश्वर पोरटे, रसिका कोवे शीला नेता किरण कुमरे कमलाबाई कुंबरे मनीषा ताई कुमरे वनिता कुम्रे, कांता मलगम उर्मिला गेडाम सह मोठ्या संख्येने नागरिक आणि महिला यावेळी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments