पिपरटोला येथील डीपी त्वरित दुरुस्त करा : प.स.माजी सभापती विलास दशमुखे


कार्यकारी अभियंता डोंगरवार यांना निवेदन


गडचिरोली : मागील आठ महिन्यांपासून तालुक्यातील पिपरटोला (धुंडेशिवणी) येथील जागोराव वट्टी यांच्या शेतात असलेली डीपी पूर्णपणे जमिनीलगत झुकलेली आहे. त्यामुळे सदर डिपी येत्या आठ दिवसात दुरुस्त करण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असा इशारा पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास दशमुखे यासह शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता डोंगरवार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सद्या पावसाळयाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांच्या शेतीचे काम सुरू झाले आहे. अशातच शेतात असलेली डीपी पूर्णपणे वाकून जमिनीला टेकली आहे. तसेच डिपीच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पुरवठाही बंद असल्याने पिकाना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तसेच डीपी जमिनीलगत झुकून असल्याने शेतकऱ्यांच्या आहे. जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची जीवितहान टाळता त्यांच्या शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी तत्काळ सदर डीपी दुरुस्त करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी विलास दशमुखे व शेतकऱ्यांनी कार्यकारी
अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली
निवेदन देताना पंचायत इय समितीचे माजी उपसभापती विलास तसे दशमुखे यासह सुरेश पाटील रंधये, प्रवे बेबी रंधये, कवळू दोडके, यशवंत मि नन्नावरे, केशव वट्टी, आनंदराव जि मडावी, भजनराव वट्टी, राजू अ मडावी, विनायक मडावी आदी वि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments