गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जि. प. क्षेत्रातील मोहटोला-निमगांव रस्त्यावरील पुलाची समस्या झाली दूर.
3 कोटी 60 लाखाचे पुलाचे बांधकाम मंजूर
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या प्रयत्नांना यश
गडचिरोली,
गडचिरोली तालुक्यातील मौशिखांब-मुरमाडी जि.प. क्षेत्रातील मोहटोला-निमगाव परिसर दुर्गम असून या दोन गावांच्या दरम्यान नाला वाहतो. या नाल्यावर उंच पुल नसल्याने पावसाळ्यात मोहटोला-निमगाव रस्त्यावरील नाल्याला पुर येतो. तसेच जुना ‘रेज कॉजवे’ मोरी बांधकाम जीर्ण झाल्याने या मार्गावर अपघाताचा धोका वाढला पावसाळ्यात हा मार्ग बंद होऊन नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो. ही गंभीर बाब शासन व प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी भागातील नागरिकांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. या मागणीची दखल घेऊन शासनाने मोहटोला-निमगाव रस्त्यावर 3 कोटी 60 लाखाच्या पुल बांधकामाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरच या भागातील नागरिकांची समस्या दूर होणार आहे.
गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त आणि अतिदुर्गम असून अतिदुर्गम भागात आजही पक्के रस्ते व नाल्यांवर पुल नाही. त्यामुळे पावसाळयात अनेक गावांचा तालुका व जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटतो. त्यामुळे पावसाळ्यात नागरिक, शाळेकरी विद्यार्थी यांना मोठया अडचनीचा सामना करावा लागतो. मोहटोला-निमगाव हा अतिदुर्गम भाग असून या मार्गावर 25 वर्षापुर्वी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने ‘रेज कॉजवे’ मोरी बांधकाम करण्यात आले होते. परंतू रेज कॉजवेची फेस वॉल कोसळल्यामुळे मार्गक्रमण करणे धोकादायक झाले आहे. अवजड वाहन गेल्यास पुल केव्हाही कोसळू शकतो. तसेच पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने मार्ग खंडीत होतो. त्यामुळे अपघाताचा धोका टाळण्यासाठी नवीन उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शासन व प्रशासनाकडे केली होती.
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी नागरिकांची समस्या शासन व प्रशासनदरबारी लावून धरल्यानंतर प्रशासनाने पुल बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या प्रयत्नामुळे मोहटोला-निमगाव रस्त्यावील पुलाची समस्या आता दूर होणार आहे.
शासनाने नाबार्ड २८ अंतर्गत मोहटोला-निमगाव (ग्रा.मा.२८) सा.क्र १/००० मध्ये पुलाचे बांधकाम करण्यासाठी ३ कोटी ६० लाख रूपयाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच मोहटोला-निमगाव भागातील नागरिकांची समस्या दूर होणार आहे. मोहटोला-निमगाव रस्त्यावर पुलाचे बांधकाम मंजूर झाल्याने नागरिकांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ काटत्रवार यांचे आभार मानले आहे. कात्रटवार हे जनतेच्या सेवेसाठी तत्पर असलेले मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर झाल्याने त्यांचे कार्यकर्ते परिसरातील नागरिकांनी भगवी पताका उंचावत जल्लोष साजरा केला. याप्रसंगी उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, उपविभाग प्रमुख संदिप भुरसे, नानाजी काळबांधे, विलास दासगाये, रामचंद्र बहाड, रामचंद्र लोहंबरे, रामदास निसार, तानबा दासगाये, रमाकांत चिंचोलकर, देवाजी होळी, अशोक कुनघाडकर, मोहन कुकूडकार, गुरुदेव होळी, मनोज चापडे, निलकंठ झोडे, महादेव भुरसे, प्रभाकर कुकडकार, नामदेव मडावी, मुरारी धोटे, चंद्रभान कोमलवार, जयकुमार खेळकर, विकास उंदिरवाडे, रविंद्र निसार, विलास उंदिरवाडे, गोपाल मोंगरकर, लोमाजी हर्षे, दिलीप वलादे, अमर निंबोरकर, सचिन सेलोटे, शामराव किरंगे, सचिन मडावी, विनायक किरंगे, किरण टेकाम, नानाजी किरंगे, केशव टेकाम, रमेश किरंगे, ईश्वर दुगा, बाबुराव किरंगे, विशाल टेकाम, अतुल दुगा, सुधाकर गेडाम, सुखदेव दुगा, रामदास गेडाम, दिपक पानसे, लालाजी आवारी, निंबाजी तिवाडे, पुरुषोत्तम राजगडे, साजन वरखडे, योगेश राजगडे, योगेश मडावी, साहिल वरखडे, अंकुश मडावी, प्रदिप वरखडे, कुणाल राजगडे, दुष्यांत खुटेमाटे, गणेश ठाकरे, करण मुरतेली, नरेंद्र ठाकरे आदी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
0 Comments