राष्ट्रसंतांचे कार्य घरोघरी पोहोचवणे सर्वांची जबाबदारी - विलास दशमुखे
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य घरोघरी पोहोचवून त्यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी सर्वांची असून ती जबाबदारी सर्वांनी पार पाडावी असे आवाहन गडचिरोली पंचायत समितीचे माजी उपसभापती विलास केशवराव दशमुखे यांनी केले. नव युवक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताह निमित्ताने भव्य विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर गडचिरोली नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती प्राध्यापक राजेश कात्रटवार, प्राचार्य समशेर खान पठाण, माजी सभापती मारोतराव ईचोडकर, भाजपा तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, गुरुदेव भक्त नानाजी वाढयी, सुनील चडगुलवार, तुकाराम गेडाम, श्री बांबोडे, आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.तर माजी सभापती मारोतराव इचोडकर यांनी गायलेल्या जय जय महाराष्ट्र या गीताने करण्यात आली
नवयुवक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने गेल्या 14 वर्षापासून सतत खंजरी भजन स्पर्धा सुरू असून ही स्पर्धा अखंड 25 वर्षे सुरू ठेवावी असे आवाहन सुद्धा विलास दशमुखे यांनी केले. या स्पर्धेचे आयोजक प्रवीणजी मुक्तावर व त्यांची टीम हे दरवर्षी उत्कृष्ट खंजिरी भजन स्पर्धा घेतात आणि प्रत्येक गावामध्ये जाऊन ध्यान प्रार्थना घेतात हे त्यांचे कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांच्या त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच प्राध्यापक राजेंशची कात्रटवार यांनी सतत चौदा वर्ष कात्रटवार सभागृह मोफत उपलब्ध करून दिले आणि श्री मोडक यांनी सुद्धा मोफत साऊंड सर्विस दिली त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रविण मुक्तावरम यांनी केले तर आभार मनोज पवार यांनी मानले
0 Comments