महिलांच्या कलागुणांना वाव देणारे सखी मंचचे कार्य कौतुकास्पद - माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

महिलांच्या कलागुणांना वाव देणारे सखी मंचचे कार्य कौतुकास्पद
माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांचे प्रतिपादन

लोकमत सखी मंच च्या बाल व सखी महोत्सवाचा समारोप


गडचिरोली :
     महिलांमध्ये अनेक कलागुण उपजतच असतात मात्र त्यांना योग्य व्यासपीठ व संधी मिळत नसल्याने ते आपल्या कलागुणांना वाव देऊ शकत नाही अनेक युवती व महिलांमध्ये विविध कला भरलेल्या असतात मात्र ते त्यांचे सादरीकरण करू शकत नाही.  याची जाणीव ठेवून लोकमत सखी मंचने महिलांच्या सांस्कृतिक व बौद्धिक विकासासाठी सुरू केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गडचिरोली शहराच्या माजी  नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. लोकमत बाल व सखी महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

    लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लोकमत बाल विकास मंच व लोकमत सखी मंचच्या माध्यमातून लहान मुले व महिलांसाठी जिल्हास्तरीय बाल महोत्सव व सखी महोत्सवाचे आयोजन दिनांक 25 व 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते काल दिनांक 26 फेब्रुवारी या महोत्सवाचा समारोप करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी  लीलाधर भरडकर होते प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे, चेतना बटुवार, अनिता साळवे, बी फॅशन प्लाझा चे संचालक मनोज देवकुले, लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉक्टर गणेश जैन, लोकमत सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी ताई आखाडे, सहसंयोजिका भाग्यश्री गड्डमवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
    या बाल व सखी महोत्सवात  महिलांसाठी विविध कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या यात प्रमुख्याने थाली सजावट सोलो डान्स, ग्रुप डान्स, एकांकिका, नाटक व वेशभूषा स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांमध्ये लोकमत सखी मंच सदस्य व अन्य महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला या स्पर्धेमध्ये विजय स्पर्धक महिलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या दोन दिवस चाललेल्या महोत्सवात मोठया प्रमाणावर लहान मुले, युवती व महिला सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

0 Comments