मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प. - भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची प्रतिक्रीया

मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प.
भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांची प्रतिक्रीया


देसाईगंज -
उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही देऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशी प्रतिक्रीया भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांनी व्यक्त केली आहे.
नवीन कर प्रणाली अंतर्गत सात लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या हाती पैसा शिल्लक राहून त्याची क्रयशक्ती
वाढेल व विकासास चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखर कारखान्यांनी २०१६ -१७ पूर्वी शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी दिलेले पैसे खर्च समजण्याची
तरतूद करून साखर कारखान्यांच्या आयकराच्या प्रश्नावर कायमचा तोडगा काढला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या वर्षात ५० नवीन विमानतळ आणि हेलिपॅडही बांधले जातील. व्यक्त तरुणांसाठी ३० आंतरराष्ट्रीय कौशल्य केंद्रे सुरू करण्यात येणार
गरिबांसाठी मोफत धान्य योजनेस मुदतवाढ, आदिवासींच्या विकास योजनांसाठी १५ हजार कोटींची रेल्वेच्या खर्चासाठी तरतूद, पारंपरिक कारागीरांच्या कौशल्याचा सन्मान, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी डिजिटल पायाभूत सुविधा, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत मर्यादेत वाढ, महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा संकल्प,आहेत.
२.४० लाख कोटी रुपये, सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योगांना (एमएसएमई) ना ९ हजार कोटींची पतहमी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची हमी यांमुळे विकासाच्या गतीला चालना मिळणार असून खऱ्या अर्थाने अमृतकाळाचा आशादायक आरंभ केंद्र झाला आहे, अशी भावनाही त्यांनी केली. सात लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नास करमुक्ती, ६० लाख रोजगारांच्या संधी, म्हणाले.

Post a Comment

0 Comments