माझ्या निवडून येण्यात सहकाराचा मोठा वाटा
आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन
सहकाराच्या माध्यमातून आज मी आमदार म्हणून जर तुमच्यापुढे उभा असेल तर ती सहकाराची मोठी ताकद आहे. गेल्या 30 वर्षापासून शिक्षकांच्या समस्यासाठी रस्त्यावर उतरून भांडत असताना, त्यांना उद्भवणाऱ्या आर्थिक समस्यांची पूर्तता करता यावी या उद्देशाने मी पंधरा वर्षांपूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेची चंद्रपूर येथे स्थापना केली आणि या पतसंस्थेच्या शाखा पूर्व विदर्भातील ६ ही जिल्ह्यात निर्माण करून ७ हजाराच्या वरून प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या शाखांशी जोडले व या माध्यमातून त्यांना सेवा दिली. हे सर्व कर्मचारी या निवडणुकीत माझे मतदार होते आणि त्याचेच फलित म्हणजे आज मी आमदार आहे.माझ्या निवडून येण्यास सहकाराचा मोठा वाटा आहे असे उद्गार नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था संघ मर्या. गडचिरोली, सहकार विभाग व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी सत्कार मूर्ती म्हणून सत्काराला उत्तर देताना काढले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा पतसंस्था संघाचे अध्यक्ष दिलीप पाटील खेवले होते तर प्रमुख अतिथी म्हणून सहकार विभागाचे अधिकारी विजय पाटील, संघाचे मानद सचिव प्रा. शेषराव येलेकर, दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचनाताई वाघरे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग घोटेकर आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पतसंस्था संघाच्या वतीने व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
आ. सुधाकर अडबाले पुढे म्हणाले, मला मिळालेला विजय हा ऐतिहासिक असून आज पर्यंतच्या 75 वर्षाच्या काळात कोणताही शिक्षक आमदार इतक्या मताधिक्याने निवडून आला नसेल. माझ्या या आमदारकीमुळे पहिल्यांदाच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले असून या आमदारकीचा उपयोग मी सहकार व शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी करणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी स्व. प्राचार्य खुशालराव वाघरे यांचे स्मृतीनिमित्त जिल्ह्यातील उत्कृष्ट पतसंस्थांना जिल्हा सहकार पुरस्कार 2022 ने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गट अ ( जिल्हास्तर) पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था
प्रथम पुरस्कार - म. रा. विद्युत मंडळ तांत्रिक कामगार सह. पतसंस्था मर्या. गडचिरोली
द्वितीय पुरस्कार - शासकीय व पंचायत समिती कर्मचारी सह. पतसंस्था कुरखेडा.
तृतीय पुरस्कार - गडचिरोली जिल्हा सार्वजनिक बांधकाम खाते कर्मचारी सह. पतसंस्था गडचिरोली.
गट अ (तालुकास्तर) पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्था
प्रथम पुरस्कार - वन कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित वडसा
द्वितीय पुरस्कार - प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित कुरखेडा.
गट ब (जिल्हास्तर) नागरी सहकारी पतसंस्था*
प्रथम पुरस्कार गृहलक्ष्मी महिला नागरी सह. पतसंस्था मर्या. गडचिरोली.
द्वितीय पुरस्कार - दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्या. गडचिरोली.
तृतीय पुरस्कार - प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आलापल्ली.
गट ब (तालुकास्तर) नागरी सहकारी पतसंस्था*
प्रथम पुरस्कार - सेमाना नागरी सह. पतसंस्था मर्या. गडचिरोली.
द्वितीय पुरस्कार वैनगंगा महिला नागरी सह. पतसंस्था मर्या. गडचिरोली.
तृतीय पुरस्कार राधाकृष्ण महिला नागरी सह. पतसंस्था मर्या. गडचिरोली.
त्याचप्रमाणे संस्कार क्रेडिट को. आप. सोसायटी मर्या. गडचिरोली, धनलक्ष्मी अर्बन क्रेडिट को. आप. सोसायटी गडचिरोली व फुले दांपत्य नागरी सहकारी पतसंस्था मर्या. धानोरा यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या दोन दिवशीय कार्यशाळेत डिजिटल बँकिंगची उपयोगिता यावर नाशिकचे हेमंत उमाटे,निधीचे गुंतवणूक व्यवस्थापन व ताळेबंद विश्लेषण यावर जिल्हा मध्य. सह. बँकेचे सेवानिवृत्त मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर , सहकारातील विविध कायद्याबाबत नागपूरचे सहकार तज्ञ एड. प्रशांत शिर्के तसेच सहकार विभागातील विविध माहिती बाबत विजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेषराव येलेकर यांनी केले. तर संचालन संघाचे व्यवस्थापक भास्कर नागपूरे व आभार संघाचे अध्यक्ष दिलीप खेवले यांनी मानले. कार्यक्रमाला ज्येष्ठ सदस्य पी. टी. पूडके, किशोर मडावी,गजानन चावके , भास्कर खोये, कृष्णा अर्जुनकर, मनोज बैरागी, दत्तात्रय खरवडे, सुनील शेरकी, लिंगाजी मोरांडे, राजेंद्र उरकुडे, चंद्रकांत शिवणकर सह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे 150 चे वरून प्रतिनिधी उपस्थित होते.
0 Comments