क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक विकासाला चालना मिळते

क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक विकासाला चालना मिळते
माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी  यांचे प्रतिपादन
पावीलसनपेठ येथे ग्रीन आर्मी चषक कबड्डी स्पर्धा


कुनघाडा रै :-  गल्ली पासून दिल्ली पर्यंत क्रिकेट, कबड्डी, खो खो , व्हॅलीबाल, टेनिस अशा अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा राबविल्या जातात शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना हा क्रीडा स्पर्धेचा मुख्य उद्देश असला तरी ग्रामीण व दुर्गम भागातील इतरही सामाजिक विकासाला चालना मिळत असते असे प्रतिपादन आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी केले संमिश्र मित्र कबड्डी क्लब पावीलसनपेठ यांच्या वतीने ग्रीन आर्मी चषक कबड्डी स्पर्धेचे उदघाटन नुकतेच पार पडले त्यावेळी ते उदघाटक म्हणून बोलत होते 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून सरपंचा रजनी उसेंडी, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भाऊराव चव्हाण, ग्रामसेवक कल्पेश हरडे, माजी प स सदस्य वसंत पोटावी, मुरलीधर कुंभमवार, अंगणवाडी सेविका संगीता पदा, मंजुळा पोटावी, भदुसिंग राठोड,जि प शाळेचे मुख्याध्यापक शंकर सुरजागडे, पत्रकार पुंडलिक भांडेकर, गुलाब मोहूर्ले, गोपाळा पोटावी, मारोती कारपेनवार, धनसिंग पवार, कवळू पोळा, हरीचंद जाधव, रामदास कांदो, रमेश पोटावी, आनंदराव मडावी आदी मान्यवर उपस्थित होते
माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी पुढे म्हणाले की , कबड्डी खेळामुळे शरीर सुदृढ व निरोगी राहत असून, निर्णय करण्याची क्षमता व सहकार्याची भावना निर्माण होते, अंगी सामर्थ्य व चतुराई वाढते . स्पर्धेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी जवळ येत असल्यामुळे गावातील समस्या ते प्रत्यक्ष जवळून बघत असतात त्यामुळे विकासाचा मार्ग मोकळा होत असतो , जोगना ते पावीलसनपेठ रस्ता व पोहर नदीवर पुलिया तसेच पावीलसनपेठे ते जंगमपूर रस्ता व पुलियाचे काम लवकरच मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी यांनी दिली. जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे यांनी सुध्दा विकासात्मक बाबीवर भाष्य केले 
कार्यक्रमाचे संचालन माजी सरपंच संतोष पदा यांनी केले तर आभार मुख्याध्यापक शंकर सूरजागडे यांनी मानले कार्यक्रमाला खेळाडू, गावातील पुरुष, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments